Galaxy S21 FE: 8GB RAM सह येतोय Samsung चा दमदार फोन; कमी किंमतीत मिळतील फ्लॅगशिप स्पेक्स
By सिद्धेश जाधव | Published: December 18, 2021 05:57 PM2021-12-18T17:57:25+5:302021-12-18T18:00:32+5:30
Samsung Galaxy S21 FE: amsung Galaxy S21 FE च्या लाँचला काही आठवडे असताना या फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. यात 8GB RAM, Qualcomm Snapdragon 888 चिपसेट आणि फास्ट चार्जिंग देण्यात येईल.
Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनच्या आतापर्यंत अनेक बातम्या आल्या आहेत. कमी किंमतीती फ्लॅगशिप अनुभव देणारा हा सॅमसंगचा फोन असल्यामुळे कंपनीचे चाहते देखील याची आतुरतेने वाट बघत आहेत. नव्या रिपोर्ट्सनुसार, हा स्मार्टफोन 4 जानेवारीला लाँच केला जाऊ शकतो. आता Samsung Galaxy S21 FE च्या लाँचला काही आठवडे असताना जर्मन पब्लिकेशन WinFuture नं या स्मार्टफोनचे डिटेल स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत.
Samsung Galaxy S21 FE चे लीक स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी फ्लॅट अॅमोलेड पॅनल मिळेल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 2340 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. यात अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि Gorilla Glass Victus ची सुरक्षा देण्यात येईल. Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 12MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 8MP चा टेलीफोटो कॅमेरा मिळेल. तर फ्रंटला 32MP चा सेल्फी शुटर मिळू शकतो.
या फ्लॅगशिप फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 चिपसेटची पॉवर देण्यात येईल. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल. हा फोन IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह बाजारात येईल. या सॅमसंग फोनमधील 4,500mAh ची बॅटरी आणि फास्ट वायर्ड आधारित वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.
Samsung Galaxy S21 FE ची संभाव्य किंमत
Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत जर्मनीमध्ये 749 यूरो (सुमारे 64,582 रुपये) असेल, ज्यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल. तर 8GB रॅम 256GB व्हेरिएंटची किंमत 749 यूरो (सुमारे 73,193 रुपये) असू शकते. हा स्मार्टफोन ग्रॅफाइट, ऑलिव्ह, लॅव्हेंडर आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल.