Galaxy S21 FE: Samsung ची कमाल! कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देणारा फोन करणार भारतात एंट्री  

By सिद्धेश जाधव | Published: December 4, 2021 01:22 PM2021-12-04T13:22:12+5:302021-12-04T13:23:28+5:30

Samsung Galaxy S21 FE India Launch: Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन जानेवारी 2022 मध्ये जागतिक बाजारसह भारतीयांच्या भेटीला देखील येईल. तसेच हा फोन व्हाइट, ब्लॅक, पिंक आणि ग्रीन कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल.

Samsung galaxy s21 fe smartphone will be launched in india  | Galaxy S21 FE: Samsung ची कमाल! कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देणारा फोन करणार भारतात एंट्री  

Galaxy S21 FE: Samsung ची कमाल! कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देणारा फोन करणार भारतात एंट्री  

Next

Samsung Galaxy S21 FE हा एक काल्पनिक फोन वाटू लागला आहे. यावर्षी जानेवारीमध्ये सॅमसंगनं S21 सीरिज सादर केली होती. तेव्हापासून सॅमसंगचे चाहते कमी किंमतीती फ्लॅगशिप फोनचा अनुभव देणाऱ्या Galaxy S21 FE ची वाट बघत आहेत. खास करून ऑगस्टमधील लाँच इव्हेंटनंतर या फोनच्या लाँचच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता हा फोन जानेवारीमध्ये आयोजित CES 2022 इव्हेंटमधून सादर केला जाईल, असं 91mobiles नं सांगितलं आहे.  

रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन जानेवारी 2022 मध्ये जागतिक बाजारसह भारतीयांच्या भेटीला देखील येईल. तसेच हा फोन व्हाइट, ब्लॅक, पिंक आणि ग्रीन कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. Galaxy S21 FE आणि Galaxy S21 च्या डिजाईनमध्ये जास्त फरक असणार नाही. सॅमसंग या स्मार्टफोनचे Snapdragon 888 आणि Exynos 2100 असलेले दोन व्हेरिएंट वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये सादर करू शकते. कंपनीचा इतिहास पाहता, भारतीयांच्या वाट्याला कंपनीचा चिपसेट येण्याची शक्यता जास्त आहे.  

Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशन्स    

Samsung Galaxy S21 FE मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले असू शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC आणि Exynos 2100 चिपसेट देण्यात येईल. तसेच फोनमध्ये 12GB पर्यंतचा RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हा फोन Adreno 660 GPU सह बाजारात येईल. सॅमसंगचा हा फोन Android 11 OS आधारित OneUI 3.1 वर चालेल. 

Samsung Galaxy S21 FE च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी यात 4500mAh ची बॅटरी मिळेल, जी 15वॉट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.  

Samsung Galaxy S21 FE ची किंमत   

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनचू युरोपियन बाजारातील किंमत समोर आली आहे. या स्मार्टाफोनचा 8GB/128GB मॉडेलची किंमत 920 यूरो (सुमारे 78,000 रुपये) असू शकते. तसेच 8GB/256GB मॉडेलची किंमत 985 यूरो (सुमारे 83,000 रुपये) असू शकते.   

Web Title: Samsung galaxy s21 fe smartphone will be launched in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.