Samsung च्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! आता मिळणार नाही 108MP कॅमेरा असलेला दमदार स्मार्टफोन, ‘हे’ आहे कारण
By सिद्धेश जाधव | Published: February 8, 2022 07:28 PM2022-02-08T19:28:03+5:302022-02-08T19:28:23+5:30
Samsung Galaxy S21 Ultra: सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर देखील S21 Ultra आऊट-ऑफ-स्टॉक दाखवला जात आहे. त्याऐवजी Galaxy S21, S21+ आणि S21 FE विकत घेण्याचा पर्याय दिला जात आहे.
Samsung च्या चाहत्यांना कंपनीनं धक्का दिला आहे. कंपनीनं आपला लोकप्रिय स्मार्टफोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती फोनअरीनाच्या रिपोर्टमधून समोर आली आहे. कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S21 Ultra सॅमसंग यूएसच्या अधिकृत वेबसाईटवर आता विक्रीसाठी उपलब्ध नाही. त्याऐवजी Galaxy S21, S21+ आणि S21 FE विकत घेण्याचा पर्याय दिला जात आहे.
युरोपात देखील या स्मार्टफोनचा स्टॉक संपला आहे. त्यामुळे लवकरच तिथेही हा फोन बंद केला जाऊ शकतो. उद्या म्हणजे 9 फेब्रुवारीला सॅमसंगनं Galaxy Unpacked 2022 या इव्हेंटचं आयोजन केलं आहे. या इव्हेंटमधून Galaxy S22 सीरिज आणि Tab S8 सीरिजची घोषणा केली जाऊ शकते. त्यात Galaxy S22 Ultra चा देखील समावेश असेल. नव्या फ्लॅगशिपच महत्व वाढावं म्हणून कंपनी जुना फ्लॅगशिप डिस्कंटिन्यू करत आहे, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे हा लेख लिहिताना सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर देखील S21 Ultra आऊट-ऑफ-स्टॉक दाखवला जात आहे.
Samsung Galaxy S21 Ultra चे स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोनमध्ये 3200 x 1440 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.8 इंचाचा क्वाडएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्रॉइड 11 वर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा एक्सनाॅस 2100 चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट 5 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे आणि डुअल मोड 5जीला सपोर्ट करतो.
Samsung Galaxy S21 Ultra च्या मागे क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये फ्लॅश लाईटसह 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळतो. त्याचबरोबर फोनमध्ये 12 मेगापिक्सलची डुअल पिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स, 10 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि 10 मेगापिक्सलची सेकंडरी टेलीफोटो लेन्स आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्राचा कॅमेरा सेग्मेंट 100X स्पेस जूम, 10X आणि 3X ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो.
सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी Galaxy S21 Ultra मध्ये 40 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचच्या मोठी बॅटरी 25वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
एकदा चार्ज करा आणि 3 दिवस विसरून जा; 1700 पेक्षा कमी किंमतीती दमदार साऊंड असलेले TWS Earbuds लाँच
50-इंचाच्या Smart TV वर आता पर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट; अशी करा Flipkart वरून स्वस्तात खरेदी