Samsung च्या या Smartphone ची कॉलर टाईट! ‘या’ फिचरनं दिली आयफोनलाही मात
By सिद्धेश जाधव | Published: June 4, 2022 02:20 PM2022-06-04T14:20:46+5:302022-06-04T14:20:53+5:30
Samsung Galaxy S22 Series मध्ये नवीन फिचर सादर करण्यात आलं आहे जे इतर कोणत्याही स्मार्टफोनमध्ये सापडत नाही.
Samsung नं यंदाची फ्लॅगशिप सीरिज आणखी खास केली आहे. कंपनीनं Samsung Galaxy S22 Series मध्ये एक असं फीचर दिलं आहे, जे जगातील इतर कोणत्याही स्मार्टफोनमध्ये मिळणार नाही. Samsung Galaxy S22 Series मध्ये आता इंटरनेटसह व्हॉइस कॉल्स देखील 5G ला सपोर्ट करतील. कुवैतमधील मोबाईल टेलीकम्यूनिकेशन कंपनी, Zain नं घोषणा केली आहे की, या सीरीजचे सर्व स्मार्टफोन्स आता ‘वॉयस ओवर 5G’ अर्थात Vo5G ला सपोर्ट करतील. हे फीचर सध्या फक्त Samsung Galaxy S22 Series च्या स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध आहे.
Vo5G म्हणजे काय
Vo5G मध्ये 5G चा वापर इंटरनेटसह व्हॉइस कॉलिंगसाठी केला जातो. जगभरात, Zain पहिली टेलीकॉम कंपनी आहे जिने Vo5G सेवा लाँच केली आहे. आणि सध्या फक्त Samsung Galaxy S22 Series च्या स्मार्टफोन्समध्ये हे फिचर देण्यात आलं आहे. येत्या काळात अन्य 5G स्मार्टफोन्समध्ये देखील हे फिचर मिळू शकतं. या नव्या सेवेमुळे 5G वॉयस कॉल्सच्या मदतीनं युजर्सना चांगली ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंग क्वॉलिटी मिळेल.
Samsung Galaxy S22 Ultra चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S22 Ultra मध्ये 6.8 इंचाचा QHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्प्लिंग रेटला सपोर्ट करतो. यात अंडर-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP68 रेटिंग देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 किंवा Exynos 2200 प्रोसेसरसह वेगवेगळ्या देशांमध्ये उपलब्ध होईल. सोबत 12GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन Android 12 आधारित OneUI 4.1 वर चालतो.
Galaxy S22 Ultra चा कॅमेरा सेगमेंट खूप खास आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. सेटअपमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 10MP चे दोन टेलीफोटो कॅमेरा मिळतात. सेल्फीसाठी 40MP चा सेन्सर देण्यात आला आहे. गॅलेक्सी एस22 अल्ट्रामध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते. जी 45W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.