सॅमसंगची सर्वात पॉवरफुल Galaxy S22 सीरीज येणार फेब्रुवारीमध्ये; झाला स्पेसिफिकेशनचा खुलासा  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 07:39 PM2021-11-03T19:39:38+5:302021-11-03T19:39:44+5:30

Samsung Galaxy S22 Price Specs and Details: Samsung Galaxy S22 ही कंपनीची आगामी फ्लॅगशिप सीरिज आहे. जी पुढील वर्षाच्या सुरवातीला सादर केली जाईल, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून मिळाली आहे.  

Samsung galaxy s22 series to launch next year in february with qualcomm snapdragon 898 chip | सॅमसंगची सर्वात पॉवरफुल Galaxy S22 सीरीज येणार फेब्रुवारीमध्ये; झाला स्पेसिफिकेशनचा खुलासा  

सॅमसंगची सर्वात पॉवरफुल Galaxy S22 सीरीज येणार फेब्रुवारीमध्ये; झाला स्पेसिफिकेशनचा खुलासा  

Next

Samsung Galaxy S22 ही कंपनीची आगामी फ्लॅगशिप सीरिज आहे. जी Qualcomm च्या Snapdragon 898 या आगामी सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह बाजारात दाखल होईल. या सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन्सचा समावेश असेल. कंपनीने मात्र या सीरिजची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु ताज्या रिपोर्ट्सनुसार Galaxy S22 सीरिज पुढील वर्षीच्या सुरुवातीला सादर केली जाऊ शकते.  

Samsung Galaxy S22 Series Launch 

प्रसिद्ध टिपस्टर Ice Universe ने दिलेल्या माहितीनुसार Samsung Galaxy S22 सीरीज पुढील वर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लाँच केली जाईल. टिपस्टरने अचूक तारीख सांगितली नाही. दुसरीकडे सॅमसंगच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या टेक वेबसाईट SamMobile ने ही सीरीज पुढील वर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते, असे म्हटले आहे. त्याआधी आठवडाभर आधी फोन्स प्री ऑर्डरसाठी उपलब्ध होतील.  

Samsung Galaxy S22 Series चे संभाव्य स्पेक्स  

Samsung Galaxy S22 सीरीजमध्ये Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra असे तीन स्मार्टफोन येतील. लीकनुसार Galaxy S22 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.06-inch FHD+ LTPS डिस्प्ले देण्यात येईल. जो एक पंच होल डिस्प्ले असेल. तर, Galaxy S22+ मध्ये 6.55 इंचाचा LTPO 120Hz AMOLED पॅनल आणि Ultra मध्ये 6.81 इंचाचा QHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. वर सांगितल्याप्रमाणे हे फोन्स Qualcomm Snapdragon 898 SoC आणि Android 12 OS मिळेल.  

फोटोग्राफीसाठी Galaxy S22 आणि Galaxy S22+ मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP ची टेलीफोटो लेन्स आणि 12MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर मिळेल. तर Ultra व्हेरिएंटमध्ये 108MP चा मेन कॅमेरा, 12MP ची टेलीफोटो लेन्स, अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि एक पेरीस्कोप लेन्स देखील मिळू शकते. Galaxy S22 मध्ये 3,800mAh ची बॅटरी, Galaxy S22+ मध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि Galaxy S22 Ultra मध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. 

Web Title: Samsung galaxy s22 series to launch next year in february with qualcomm snapdragon 898 chip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.