ठरलं तर! या तारखेला येणार आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Samsung स्मार्टफोन; शाओमी-वनप्लसची झोप उडवणार
By सिद्धेश जाधव | Published: January 21, 2022 07:03 PM2022-01-21T19:03:29+5:302022-01-21T19:05:24+5:30
Samsung Galaxy Unpacked 2022: सॅमसंगची आगामी Galaxy S22 Series फेब्रुवारीमध्ये लाँच होईल, अशी माहिती कंपनीच्या प्रेजिडेन्टची माहिती दिली आहे.
Samsung Galaxy Unpacked Event 2022 पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये आयोजित करण्यात येईल. अचूक अशी तारीख समोर आली नाही. परंतु कंपनीचे प्रेजिडेन्ट MX बिजनेसचे हेड Dr. TM Roh यांनी आगामी अनपॅक्ड इव्हेंटची माहिती दिली आहे. आगामी Galaxy S22 सीरीज S-Pen सपोर्टसह सादर केली जाऊ शकते. सीरिजमधील सर्व पेन्स सोबत S-Pen वापरता येईल.
“फेब्रुवारीमध्ये आयोजित Unpacked 2022 इव्हेंट मध्ये आम्ही आतापर्यंतचा सर्वात नोटवर्दी एस सीरीज सादर करणार आहोत,” असं सॅमसंग प्रेजिडेन्टनी म्हटलं आहे. संपूर्ण सीरिजचा उल्लेख केल्यामुळे Galaxy S सीरीजच्या सर्व फोन्समध्ये Note सीरीज प्रमाणे S-Pen सपोर्ट मिळेल, असा अंदाज लावला जात आहे. 2020 नंतर कंपनीनं नवीन नोट सीरिज सादर केलेली नाही.
Samsung Galaxy S22 series
मीडिया रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S22 सीरीजमध्ये Samsung Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra असे तीन स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. या सीरीजची डिजाइन जुन्या Galaxy S21 सीरीजसारखी असू शकते. Galaxy S22 Ultra मध्ये क्वॉड रियर कॅमेरा असलेली डिजाइन मिळेल. अन्य दोन फोन्स ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येऊ शकतात.
Galaxy S22 Ultra हा फोन कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 5000mAh ची बॅटरी आणि नवीन Exynos 2200 SoC सह येऊ शकतो. काही ठिकाणी हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 सह येईल. Galaxy S22 Ultra च्या मागे 108MP चा प्रायमरी सेन्सर मिळू शकतो. सोबत 12MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर, 10MP चा 10x टेलीफोटो सेन्सर आणि 10MP चा 3x टेलीफोटो कॅमेरा मिळेल. अन्य दोन डिवाइसेज 50MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह येऊ शकतात.
हे देखील वाचा:
Vivo नं गुपचूप सादर केला सुंदर स्मार्टफोन; स्वस्तात 5000mAh Battery आणि 5GB RAM
WhatsApp ग्रुप अॅडमिनचं काम सोपं नाही! या 5 चुका घडवू शकतात तुरुंगवास