अशी दिसेल Samsung ची सर्वात पॉवरफुल Galaxy S22 सीरीज; लाँच होण्याआधीच फोटोज, स्पेसिफिकेशन्स लीक
By सिद्धेश जाधव | Published: February 2, 2022 06:52 PM2022-02-02T18:52:50+5:302022-02-02T18:53:16+5:30
Samsung Galaxy S22 Ultra: Galaxy S22 सीरीजचे काही ऑफिशियल वाटणारे फोटोज लीक झाले आहेत. तसेच स्पेक्सची माहिती देखील सॅमसंग इटलीच्या वेबसाईटवरून मिळाली आहे.
Samsung Galaxy S22 Ultra: Samsung Galaxy S22 सीरीज येत्या 9 फेब्रुवारीला ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये Samsung Galaxy S22, Galaxy S22+, आणि Galaxy S22 Ultra असे तीन स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. आता आगामी Galaxy S22 सीरीजचे काही ऑफिशियल वाटणारे फोटोज लीक झाले आहेत. तसेच स्पेक्सची माहिती देखील सॅमसंग इटलीच्या वेबसाईटवरून टिपस्टर इवान ब्लास आणि GSMArena नं शेयर केली आहे.
Galaxy S22 सीरीज की किंमत
टिपस्टर Jon Prosser नं सांगितलं आहे कि, Samsung Galaxy S22 स्मार्टफोन 799 डॉलर (सुमारे 59,800 रुपये), Galaxy S22+ स्मार्टफोन 999 डॉलर (सुमारे 74,800 रुपये) आणि Galaxy S22 Ultra स्मार्टफोन 1,199 डॉलर (सुमारे 89,800 रुपये) मध्ये अमेरिकेत लाँच होतील.
Galaxy S22 सीरीजचे लीक स्पेक्स
Samsung Galaxy S22 स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा, Galaxy S22+ मध्ये 6.6 इंचाचा आणि Galaxy S22 Ultra मध्ये 6.8 इंचचा डिस्प्ले मिळेल. परंतु तिन्ही स्मार्टफोनमध्ये Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात येईल, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. पीक ब्राईटनेस मात्र Ultra मध्ये 1,750 निट्स असेल तर Galaxy S22 आणि Galaxy S22+ 1,300 निट्स पीक ब्राईटनेससह येतील.
Samsung Galaxy S22 सीरीज 4nm प्रोसेसरवर बनलेल्या Exynos 2200 SoC सह सादर करण्यात येईल. सोबत Xclipse GPU मिळेल. काही देशांमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट असलेला व्हर्जन येईल. यातील वॅनिला Samsung Galaxy S22 स्मार्टफोन 25W फास्ट चार्ज सपोर्टसह सादर केला जाईल. तर प्लस आणि अल्ट्रा मॉडेल 45W फास्ट चार्जिंगसह येतील.
Galaxy S22 आणि Galaxy S22+ स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. सोबत 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 30x स्पेस झूम असलेली 10-मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स मिळेल. तर अल्ट्रा मोडले 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12-मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा, 10-मेगापिक्सल टेलीफोटो कॅमेरा आणि 100x स्पेस झूम असलेल्या 10-मेगापिक्सल पेरिस्कोप कॅमेऱ्यासह बाजारात येईल. Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये 40-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल तर Galaxy S22 आणि Galaxy S22+ स्मार्टफोन युजर्सना 10MP वर समाधान मानावं लागू शकतं.
हे देखील वाचा:
- 108MP कॅमेरा, 50MP ड्युअल सेल्फी कॅमेरा असलेल्या शानदार फोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट; जाणून घ्या Flipkart ची ऑफर
- 6000mAh पर्यंतची बॅटरी असलेले हे Redmi फोन्स देतील दिवसभराचा बॅकअप; किंमत 12,500 पासून सुरु