अँड्रॉइडचा बादशहा! Samsung Galaxy S22 सीरीज पुढील महिन्यात होऊ शकते लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 06:56 PM2022-01-11T18:56:28+5:302022-01-11T18:56:57+5:30
Samsung Galaxy S22 Series: दक्षिण कोरियात Samsung Galaxy S22 सीरीज फेब्रुवारी मध्ये लाँच केली जाऊ शकते. या सीरिजमध्ये कंपनी तीन स्मार्टफोन सादर करू शकते.
Samsung नं कालच भारतात आपला स्वस्त फ्लॅगशिप Galaxy S21 FE सादर केला आहे. परंतु कंपनीचे चाहते आगामी प्रीमिमय फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Galaxy S22 ची वाट देखील बघत आहेत. रिपोर्ट्सनुसार, दक्षिण कोरियात Samsung Galaxy S22 सीरीज फेब्रुवारी मध्ये लाँच केली जाऊ शकते. या सीरिजमध्ये कंपनी तीन स्मार्टफोन सादर करू शकते.
DDaily वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, Samsung 8 फेब्रुवारीला Galaxy Unpacked 2022 व्हर्च्युअल इव्हेंटचे आयोजन करणार आहे. हा इव्हेंट Galaxy S22 सीरीजच्या लाँचसाठी आयोजित केला जाईल. लाँच झाल्यानंतर 9 फेब्रुवारीपासून या सीरिजचं प्री-रेजिस्ट्रेशन सुरु होईल तर 21 फेब्रुवारीपासून शिपिंग सुरु होईल. त्यानंतर Galaxy S22 सीरीज 24 फेब्रुवारीपासून दक्षिण कोरियात खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Galaxy S22 सिरीजचे संभाव्य स्पेक्स
ही सॅमसंगची फ्लॅगशिप सीरिज असल्यामुळे यात Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही देशांमध्ये कंपनी आपल्या एक्सनॉस प्रोसेसरचा वापर करू शकते. हे फोन 12GB पर्यंतच्या रॅमसह सादर केले जातील. आगामी फ्लॅगशिप सॅमसंग स्मार्टफोन Android 12 आधारित One UI 4.0 वर चालतील. यात 4500mAh किंवा त्यापेक्षा मोठी बॅटरी 80W फास्ट चार्जसह दिली जाऊ शकते.
हे देखील वाचा: