1000GB मेमरी आणि 108MP कॅमेऱ्यासह आला Samsung चा सर्वात पावरफुल 5G फोन, इतकी आहे किंमत

By सिद्धेश जाधव | Published: March 24, 2022 12:38 PM2022-03-24T12:38:27+5:302022-03-24T12:38:55+5:30

Samsung Galaxy S22 Ultra: सॅमसंगनं गॅलेक्सी एस22 अल्ट्रा स्मार्टफोनचा 1TB (1000जीबी) स्टोरेज मॉडेल सादर केला आहे. या नव्या व्हेरिएंटसाठी सॅमसंग लाईव्हवर एक खास सेल इव्हेंटचं आयोजन केलं आहे. 

Samsung Galaxy S22 Ultra 5G Launched In India With 1000GB Storage 108MP Camera Price Sale Specification  | 1000GB मेमरी आणि 108MP कॅमेऱ्यासह आला Samsung चा सर्वात पावरफुल 5G फोन, इतकी आहे किंमत

1000GB मेमरी आणि 108MP कॅमेऱ्यासह आला Samsung चा सर्वात पावरफुल 5G फोन, इतकी आहे किंमत

Next

Samsung Galaxy S22 Ultra गेल्या महिन्यात भारतात सादर केला होता. आधीच शक्तिशाली असणाऱ्या या स्मार्टफोनची आता कंपनीनं ताकद वाढवली आहे. सॅमसंगनं गॅलेक्सी एस22 अल्ट्रा स्मार्टफोनचा 1TB (1000जीबी) स्टोरेज मॉडेल सादर केला आहे. या नव्या व्हेरिएंटसाठी सॅमसंग लाईव्हवर एक खास सेल इव्हेंटचं आयोजन केलं आहे. 

या 1TB व्हेरिएंटची किंमत 1,34,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 28 मार्चला शाम 6 वाजता लाईव्ह इव्हेंटमधून Samsung.com वर सेलसाठी उपलब्ध होईल. गॅलेक्सी S22 1TB व्हेरिएंटच्या खरेदीवर 29,900 रुपयांचं गॅलेक्सी वॉच 4 2999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. गॅलेक्सी एस आणि गॅलेक्सी नोट सीरीजच्या युजर्सना 8000 रुपयांचा अपग्रेड बोनस मिळेल, तर अन्य डिवाइसवर 5000 रुपयांचा अपग्रेड बोनस मिळेल.  

Samsung Galaxy S22 Ultra चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy S22 Ultra मध्ये 6.8 इंचाचा QHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्प्लिंग रेटला सपोर्ट करतो. यात अंडर-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP68 रेटिंग देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 किंवा Exynos 2200 प्रोसेसरसह वेगवेगळ्या देशांमध्ये उपलब्ध होईल. सोबत 12GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन Android 12 आधारित OneUI 4.1 वर चालतो. 

Galaxy S22 Ultra चा कॅमेरा सेगमेंट खूप खास आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. सेटअपमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 10MP चे दोन टेलीफोटो कॅमेरा मिळतात. सेल्फीसाठी 40MP चा सेन्सर देण्यात आला आहे. गॅलेक्सी एस22 अल्ट्रामध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते. जी 45W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.   

 

Web Title: Samsung Galaxy S22 Ultra 5G Launched In India With 1000GB Storage 108MP Camera Price Sale Specification 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.