200MP कॅमेरासह येऊ शकतो Samsung Galaxy S22! सॅमसंगने केली Olympus सोबत भागेदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 06:22 PM2021-07-13T18:22:35+5:302021-07-13T18:27:14+5:30
Galaxy S22 Ultra 200MP Camera: Galaxy S22 Ultra मध्ये 200 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह पाच कॅमेरे असलेला सेटअप देण्यात येईल, मुख्य कॅमेरा Olympus ब्रँडचा असेल.
Samsung ने ऑगस्टमध्ये गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटचे आयोजन केले आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून कंपनी Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन लाँच करू शकते. त्यानंतर कंपनी आपले लक्ष Galaxy S22 वर केंद्रित करेल. पुढल्या वर्षी येणाऱ्या या सॅमसंग फ्लॅगशिप स्मार्टफोन्सबद्दल अनेक लीक रिपोर्ट समोर येऊ लागले आहेत. आता एका रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे कि सॅमसंगच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.
आगामी फ्लॅगशिप Galaxy S22 सीरीज Galaxy S21 प्रमाणे जानेवारीत लाँच केली जाऊ शकते. या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजमधील Galaxy S22 Ultra मध्ये 200 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह पाच कॅमेरे असलेला सेटअप देण्यात येईल, मुख्य कॅमेरा Olympus ब्रँडचा असेल. जपानी कंपनी Olympus आपल्या ऑप्टिकल टेक्नॉलॉजीसाठी जगप्रसिद्ध आहे. यापूर्वी देखील Samsung आणि Olympus यांच्या भागेदारीच्या बातम्या आल्या होत्या.
सॅमसंगच्या आगामी Galaxy S22 Ultra मध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो, ही बातमी याआधी देखील समोर आली आहे. परंतु काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती कि, Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा थर्ड जेनेरेशन 108MP ISOCELL HM3 कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते कि, Galaxy S22 Ultra मध्ये S Pen सपोर्ट देखील मिळेल.