सर्वात पॉवरफुल अँड्रॉइड फोनची माहिती आली समोर; S Pen सपोर्टसह Samsung Galaxy S22 Ultra होऊ शकतो लाँच
By सिद्धेश जाधव | Published: October 12, 2021 03:42 PM2021-10-12T15:42:06+5:302021-10-12T15:42:31+5:30
Upcoming Samsung Phone Galaxy S22 Ultra: Samsung Galaxy S22 series पुढील वर्षी म्हणजे 2022 च्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते. या सीरिजमधील Galaxy S22 Ultra ची माहिती लीक झाली आहे.
अँड्रॉइड फोन्समध्ये Samsung च्या फ्लॅगशिप सीरिजकडे सर्वात शक्तिशाली फोन्स म्हणून बघितले जाते. कंपनीने हे वारंवार पॉवरफुल स्मार्टफोन्स सादर करून सिद्ध केले आहे. आता पुन्हा एकदा सॅमसंग आपल्या फ्लॅगशिप Galaxy S सीरिजच्या तयारीला लागली आहे. Samsung Galaxy S22 series पुढील वर्षी म्हणजे 2022 च्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते.
सॅमसंग आपल्या आगामी फ्लॅगशिप सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन सादर करणार आहे. यातील Samsung Galaxy S22+ च्या डिजाईनची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तसेच आता Galaxy S22 आणि Galaxy S22 Ultra स्मार्टफोनचे रेंडर देखील लीक झाले आहेत. यातील शक्तीशाली Ultra व्हेरिएंट्स इन-बिल्ट S Pen सह सादर अशी माहिती Galaxy S22 Ultra च्या केस रेंडरमधून समोर आली आहे.
Galaxy S22 Ultra एस पेन सपोर्ट
टेक वेबसाईट GizmoChina ने सॅमसंगच्या Galaxy S22 Ultra चे केस रेंडर शेयर केले आहेत. या रेंडर्सनुसार, आगामी Galaxy S22 Ultra स्मार्टफोन S Pen स्टायलससह सादर केला जाऊ शकतो. Galaxy S series मध्ये स्टायलस स्टायलस इन-बिल्ट देण्यात येईल. परंतु Galaxy S21 Ultra स्टायलसला सपोर्ट करणारा पहिला Galaxy S मधील फोन होता.
Samsung Galaxy S22 Ultra चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा Dynamic AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन 120Hz च्या हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. फोनच्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. सोबत 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 10x झूम सपोर्टसह 10MP ची टेलीफोटो लेन्स दिली जाऊ शकते. Galaxy S22 Ultra स्मार्टफोन शक्तिशाली Qualcomm Snapdragon 895 चिपसेटसह बाजारात दाखल होऊ शकतो. काही बाजारपेठांमध्ये सॅमसंग Exynos 2200 चा वापर करू शकते.