200MP कॅमेरासह Samsung Galaxy S23 Ultra लाँच, एकापेक्षा एक पावरफुल फिचर्स; पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 09:08 AM2023-02-02T09:08:34+5:302023-02-02T09:11:59+5:30

Samsung Galaxy S23 सीरिजला Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये फ्लॅगशिप वैशिष्ट्यांसह ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आली आहे.

Samsung Galaxy S23 Ultra Launched With 200MP Camera More Powerful Features | 200MP कॅमेरासह Samsung Galaxy S23 Ultra लाँच, एकापेक्षा एक पावरफुल फिचर्स; पाहा...

200MP कॅमेरासह Samsung Galaxy S23 Ultra लाँच, एकापेक्षा एक पावरफुल फिचर्स; पाहा...

Next

Samsung Galaxy S23 सीरिजला Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये फ्लॅगशिप वैशिष्ट्यांसह ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये लॉन्च केलेल्या कंपनीच्या पहिल्या वहिल्या 200MP कॅमेरा मोबाइलनं सर्वांची उत्सुकता वाढवली आहे. Samsung Galaxy S23 Ultra 5G मध्ये सीक्युरिटीसाठी कंपनीने प्रथमच Gorilla Glass Victus 2 चा वापर केला आहे. सॅमसंग गॅलेक्‍सी S23 अल्ट्राच्‍या किंमतीपासून ते फिचर्सपर्यंत संपूर्ण माहिती जाणून घेऊ...

Samsung Galaxy S23 Ultra 5G Specifications

डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर: फोनमध्ये 1-120Hz च्या डायनॅमिक रिफ्रेश रेटसह ६.८-इंच एज क्वाडएचडी+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो गेम मोडमध्ये 240Hz टच सॅम्पलिंग रेट ऑफर करतो. हा फोन Android 13 वर आधारित One UI 5.1 वर काम करतो.

चिपसेट: फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन २ प्रोसेसर आहे ज्यामध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज आहे.

कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील पॅनलवर क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, 200 मेगापिक्सेल प्राइमरी वाइड कॅमेरा सेन्सरसह 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. 10 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर 3x ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा सेन्सर आणि 10X ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा सेन्सर. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, 5जी, वाय-फाय 6ई, 4जी एलटीई आणि ब्लूटूथ व्हर्जन 5.3 सपोर्ट देण्यात आला आहे. या हँडसेटसह, कंपनी आपल्या ग्राहकांना S Pen Stylus देखील ऑफर करेल.

बॅटरी क्षमता: 15 W फास्ट वायरलेस चार्जिंग 2.0 ला सपोर्ट करणार्‍या फोनला जीवदान देण्यासाठी 45 W वायर्ड चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. या चार्जिंग तंत्रज्ञानाबाबत असा दावा करण्यात आला आहे की, फोनची बॅटरी अवघ्या 20 मिनिटांत 65 टक्के चार्ज होते.

Samsung Galaxy S23 Ultra Price
प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटची किंमत $ 1199 (सुमारे 98 हजार 300 रुपये) आहे, ही किंमत फोनच्या 8 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. तुम्हाला फोन क्रीम, फँटम ब्लॅक, लैव्हेंडर आणि हिरव्या रंगात मिळेल.

Web Title: Samsung Galaxy S23 Ultra Launched With 200MP Camera More Powerful Features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :samsungसॅमसंग