Samsung Galaxy S24 सिरीज लाँच; अंधाऱ्या खोलीतही क्लिअर फोटो येणार, 12 MP चा सेल्फी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 09:04 AM2024-01-18T09:04:10+5:302024-01-18T09:17:12+5:30
याच दिवशी अॅप्पलने सॅमसंगचा जगातील एक नंबरचा ताज काढून घेतला आहे. आता सॅमसंगने Samsung Galaxy S24 सिरीज आणत आपले स्थान परत मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.
सॅमसंगने बुधवारी रात्री गॅलॅक्सी अनपॅक्ड इव्हेंटचे आयोजन केले होते. यावेळी कंपनीने २०२४ च्या नव्या श्रेणीचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. महत्वाचे म्हणजे याच दिवशी अॅप्पलने सॅमसंगचा जगातील एक नंबरचा ताज काढून घेतला आहे. आता सॅमसंगने Samsung Galaxy S24 सिरीज आणत आपले स्थान परत मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.
Samsung Galaxy S24 चा सर्वांत महागडा फोन हा Samsung Galaxy S24 Ultra आहे. यामध्ये 6.8-inch Quad HD+ Dynamic AMOLED 2X Infinity-O डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 1-120Hz असा व्हेरिएबल रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. Corning Gorilla Armor चा वापर करण्यात आला आहे. याद्वारे व्हिज्युअर क्लिएरिटी मिळते, यामुळे ७५ टक्क्यांपर्यंत रिफ्लेक्शन कमी होत आहे. भारतातील किंमती आज जाहीर केल्या जाणार आहेत.
या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. Galaxy S23 Ultra च्या तुलनेत हा फोन १.९ पटींनी जास्त मोठा आहे. यामध्ये 200MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. 12-megapixel अल्ट्रा वाइड एंगल लेंस देण्यात आली आहे. 10MP टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच 50MP चा पेरिस्कोप लेंस देण्यात आली आहे. तसेच 12-megapixel चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 1.4 μm सेंसर देण्यात आला असून कमी लाईटमध्ये देखील आधीच्या तुलनेत ६० टक्के जास्त लाईटमधील फोटो काढता येणार आहेत.
Samsung Galaxy S24 Ultra मध्ये Android 14 सह One UI 6.1 ऑपरेटिंग सिस्टम आहे. यात 7 जनरेशनपर्यंत OS अपडेट आणि सात वर्षांसाठी सुरक्षा अपडेट मिळतील. कंपनीने नवीन AI फीचरची घोषणा केली आहे. यात रिअल टाइम ट्रान्सलेशन फीचर आहे, जे कॉल आणि मेसेजला सपोर्ट करेल. याशिवाय, हे व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम इत्यादी मेसेजिंग अॅपला देखील सपोर्ट करेल.