Samsung फॅन्स व्हा तयार! बजेटमध्ये येतोय शानदार टॅबलेट, भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस 

By सिद्धेश जाधव | Published: December 29, 2021 01:15 PM2021-12-29T13:15:21+5:302021-12-29T13:15:55+5:30

Samsung Galaxy Tab A8 India: Samsung Galaxy Tab A8 चा भारतीय लाँच टीज करण्यात आला आहे. हा टॅब 7,040एमएएचची बॅटरी आणि 10.5 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह बाजारात येईल.

Samsung galaxy tab a8 india launch teaser on amazon india  | Samsung फॅन्स व्हा तयार! बजेटमध्ये येतोय शानदार टॅबलेट, भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस 

Samsung फॅन्स व्हा तयार! बजेटमध्ये येतोय शानदार टॅबलेट, भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस 

Next

Samsung नं काही दिवसांपूर्वी आपला बजेट फ्रेंडली टॅबलेट Galaxy Tab A8 सादर केला होता. हा टॅब आता भारतीय लाँचसाठी सज्ज झाल्याचं दिसतंय, कारण Amazon India नं Galaxy Tab A8 टॅबलेट फीचर्ससह लिस्ट केला आहे. हा टॅबलेट जागतिक बाजारात जानेवारी 2022 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. परंतु भारतात मात्र कंपनीनं हा टॅबलेट टीज करण्यास सुरुवात केली आहे. या टॅबच्या किंमतीची अधिकृत माहिती आली नाही परंतु या सीरिजचे टॅब परवडणारे असतात.  

Samsung Galaxy Tab A8 चे स्पेसिफिकेशन्स  

या टॅबमधील 10.5 इंचाचा मोठा डिस्प्ले एक महत्वाची खासियत आहे. हा एक डब्ल्यूयूएक्सजीए डिस्प्ले आहे, जो 16:10 अस्पेक्ट रेशियो आणि 1920 x 1200 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा Galaxy Tab A8 अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो. यात प्रोसेसिंगसाठी 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यातील चिपसेट मात्र वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळा असेल.   

हा सॅमसंग टॅब LTE आणि Wi-Fi दोन्ही मॉडेल्समध्ये आला आहे. स्टोरेज आणि रॅम पाहता कंपनीनं यात तीन व्हेरिएंट्स सादर केले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मिळते. तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असे अजून दोन व्हर्जन समोर आले आहेत. या व्हेरिएंट्समध्ये मेमरी 1 टीबीपर्यंत वाढवता येते. गॅलेक्सी टॅब ए8 मध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 7,040एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  

हे देखील वाचा: 

Samsung युजर्स सावधान! अधिकृत अ‍ॅप स्टोरच करतंय धोकादायक अ‍ॅप्सचा प्रसार; अशाप्रकारे सुरक्षित ठेवा स्मार्टफोन

फक्त 500 रुपयांमध्ये आला 15 तास चालणारा Bluetooth Neckband; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Web Title: Samsung galaxy tab a8 india launch teaser on amazon india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.