धुमाकूळ घालण्यासाठी आला Samsung चा स्वस्त आणि मस्त टॅबलेट; संपता संपणार नाही 7000mAh बॅटरी
By सिद्धेश जाधव | Published: January 12, 2022 02:04 PM2022-01-12T14:04:01+5:302022-01-12T14:04:33+5:30
Samsung Galaxy Tab A8 Price In India: भारतात Samsung Galaxy Tab A8 टॅबलेट 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे. यात 7040mAh ची बॅटरी, 4GB RAM आणि 10.5 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.
Samsung Galaxy Tab A8 Price In India: Samsung Galaxy Tab A8 (2021) टॅबलेट काही दिवसांपूर्वी अॅमेझॉन इंडियावर लिस्ट झाला होता, परंतु तेव्हा याची किंमत समजली नव्हती. आता भारतात Samsung Galaxy Tab A8 (2021) 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे. यात 7040mAh ची बॅटरी, 4GB RAM आणि 10.5 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.
Samsung Galaxy Tab A8 (2021) ची किंमत
Samsung Galaxy Tab A8 टॅबलेटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु लाँच ऑफर अंतरंगार्त कार्ड पेमेंटवर 2000 रुपयांचा डिस्काउंट आणि 999 रुपयांमध्ये बुक कव्हर देण्यात येईल. हा टॅबलेट 17 जानेवारीपासून Amazon, Flipkart, Samsung e-store, आणि रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल. कंपनीनं या टॅबलेटचे ग्रे, सिल्व्हर आणि पिंक गोल्ड कलर व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. या किंमतीत सॅमसंगला रियलमी, नोकिया आणि लेनोवोकडून टक्कर मिळू शकते.
Samsung Galaxy Tab A8 (2021) चे स्पेसिफिकेशन्स
या टॅबमधील 10.5 इंचाचा फुल एचडी+ मोठा डिस्प्ले एक महत्वाची खासियत आहे. हा एक डब्ल्यूयूएक्सजीए डिस्प्ले आहे, जो 16:10 अस्पेक्ट रेशियो आणि 1920 x 1200 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा Galaxy Tab A8 अँड्रॉइड 11 ओएस बेस्ड OneUI 3 वर चालतो. यात प्रोसेसिंगसाठी 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टकोर प्रोसेसर सह UniSoC T618 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत ग्राफिक्ससाठी Mali G52 GPU मिळतो.
अॅमेझॉनवर टॅबलेटचे तीन व्हेरिएंट्स दिसत आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मिळते. तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असे अजून दोन व्हर्जन समोर आले आहेत. या व्हेरिएंट्समध्ये मेमरी 1 टीबीपर्यंत वाढवता येते. गॅलेक्सी टॅब ए8 मध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 7,040एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
15 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi च्या 5G Phone वर 9,500 रुपयांची सूट; आत्ताच जाणून घ्या ऑफर