लहान मुलांसाठी आला Samsung चा खास नवीन टॅब; उंचावरून पडल्यावर देखील राहील सुरक्षित 

By सिद्धेश जाधव | Published: December 18, 2021 01:18 PM2021-12-18T13:18:17+5:302021-12-18T13:18:27+5:30

Samsung Galaxy A Kids: Samsung नं खास लहान मुलांसाठी नवीन टॅब सादर केला आहे. यातील मारुसिया नावाची डिजिटल असिस्टंट मुलांना गोष्टी, गाणी आणि खेळांसह करमणुकीसाठी प्रोग्राम करण्यात आली आहे.  

Samsung galaxy tab a kids launched with a digital assistant and 5100mah battery check price   | लहान मुलांसाठी आला Samsung चा खास नवीन टॅब; उंचावरून पडल्यावर देखील राहील सुरक्षित 

लहान मुलांसाठी आला Samsung चा खास नवीन टॅब; उंचावरून पडल्यावर देखील राहील सुरक्षित 

googlenewsNext

Samsung नं खास लहान मुलांसाठी नवीन टॅब सादर केला आहे. सॅमसंगच्या Galaxy Tab A7 Lite चा Kids व्हर्जन आहे. सध्या याची विक्री रशियात केली जात आहे. या खास व्हर्जनसाठी सॅमसंगनं लेगो सारख्या किड्स ब्रँड्ससोबत भागेदारी केली आहे आणि टॅबमध्ये 20 पेक्षा जास्त शैक्षणिक आणि करमणुकीचे अ‍ॅप्लिकेशन आधीच दिले आहेत. तसेच यातील मारुसिया नावाची डिजिटल असिस्टंट मुलांना गोष्टी, गाणी आणि खेळांसह करमणुकीसाठी प्रोग्राम करण्यात आली आहे.  

Samsung Galaxy A Kids चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy A Kids मध्ये लहान मुलांचा विचार करून बनवलेला इंटरफेस देण्यात आला आहे. तसेच यावर काय करता आणि बघता येईल यावर पालकांचं नियंत्रण असेल. यासाठी कंपनीनं पॅरेंटल कंट्रोल दिला आहे. टॅबलेटसोबत मिळणारी शॉक-रेजिस्टेंट केस हातातून पडल्य 

हा टॅब 8.7 इंचाच्या टीएफटी टचस्क्रीन डिस्प्लेसह बाजारात आला आहे. ज्याचे रिजॉल्यूशन 1340x800 पिक्सल आहे. यात MediaTek Helio P22T SoC ची प्रोसेसिंग पॉवर मिळते. टॅबलेटच्या मागे 8-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर फ्रंटला 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.  

Samsung Galaxy A Kids एक वाय-फाय ओन्ली टॅबलेट असल्यामुळे यात सिम टाकता येत नाही. तसेच यात 3GB RAM आणि 32GB बिल्ट-इन मेमोरी आहे, जी मायक्रोएसडी कार्डनं 1TB पर्यंत वाढवता येते. ावर देखील डिवाइसला सुरक्षित ठेवतो. यात दिवसभर चालणारी 5,100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

Samsung Galaxy A Kids ची किंमत  

Samsung Galaxy A Kids ची किंमत रशियात 14,990 रुबल (सुमारे 15,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. या टॅबसोबत आकर्षक कव्हर आणि स्टँड्स विकत घेता येतील. भारतासह जगभरात हा टॅबलेट कधी येईल, याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही. 

हे देखील वाचा :

स्मार्टफोनच्या तळाला असलेल्या हा छोटा होल बुजवला तर? याचा उपयोग तरी काय?; जाणून घ्या

स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर मिळतेय भरघोस सूट; OnePlus 9 सीरीजवर 8,000 रुपयांपर्यंतची बचत

Web Title: Samsung galaxy tab a kids launched with a digital assistant and 5100mah battery check price  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.