10.4 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह Samsung चा शानदार टॅबलेट; संपता संपणार नाही 7040mAh ची बॅटरी  

By सिद्धेश जाधव | Published: May 14, 2022 12:05 PM2022-05-14T12:05:05+5:302022-05-14T12:05:15+5:30

Samsung Galaxy Tab S6 Lite (2022) व्हेरिएंट लाँच झाला आहे, यात Snapdragon 720G प्रोसेसर, 4GB RAM, 7,040mAh ची बॅटरी आणि S Pen सपोर्ट मिळतो.  

Samsung Galaxy Tab S6 Lite 2022 Launched With S Pen Support Know Price   | 10.4 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह Samsung चा शानदार टॅबलेट; संपता संपणार नाही 7040mAh ची बॅटरी  

10.4 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह Samsung चा शानदार टॅबलेट; संपता संपणार नाही 7040mAh ची बॅटरी  

Next

2020 मध्ये असलेल्या टॅबलेटचा Samsung Galaxy Tab S6 Lite (2022) व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे. या टॅबमधील एक्सिनॉस प्रोसेसरची जागा क्वॉलकॉम प्रोसेसरनं घेतली आहे. हा टॅबलेटसॅमसंगनं Snapdragon 720G प्रोसेसर, 4GB RAM, 7,040mAh ची बॅटरी आणि S Pen सपोर्टसह सादर केला आहे.  

स्पेसिफिकेशन्स  

हा टॅब 10.4-इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह बाजारात आला आहे, जो 1,200×2,000 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो.  यात Snapdragon 720G प्रोसेसर देण्यात आले, त्याचबरोबर 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. हा टॅब Android 12 आधारित One UI 4 वर चालतो.  

फोटोग्राफीसाठी यात 8MP चा रियर कॅमेरा मिळतो, तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. साउंडसाठी यात AKG ट्यून स्टीरियो स्पिकर देण्यात आले आहेत, जे Dolby Atmos ला सपोर्ट करतात. हा टॅब सॅमसंगची ओळख असलेल्या S Pen सपोर्टसह येतो. टॅबमध्ये 7,040mAh ची बॅटरी आहे, जी यूएसबी टाइप-सी पोर्टनं चार्ज करता येते. सिंगल चार्जवर हा टॅब 12 तास चालतो.  

Samsung Galaxy Tab S6 Lite (2022) ची किंमत हा टॅबलेट युरोपमध्ये 399.90 युरो (जवळपास 32,200 रुपये) मध्ये सादर करण्यात आली आहे. सॅमसंगनं टॅबचा 4GB रॅम व 64GB स्टोरेज असलेला एकच मॉडेल सादर केला आहे. या टॅबलेटच्या भारतीय उपलब्धतेची माहिती मात्र समोर आली नाही. परंतु भारतीय किंमत कमी असण्याची शक्यता आहे.   

Web Title: Samsung Galaxy Tab S6 Lite 2022 Launched With S Pen Support Know Price  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.