Samsung Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 Lite ची किंमत आली समोर; 23 जूनपासून सुरु होईल सेल
By सिद्धेश जाधव | Published: June 18, 2021 03:13 PM2021-06-18T15:13:06+5:302021-06-18T15:13:57+5:30
Samsung Galaxy Tab S7 FE and Tab A7: Samsung ने काही दिवसांपूर्वी Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 लाँच केले होते.
Samsung ने काही दिवसांपूर्वी Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 लाँच केले होते. कंपनीनी आता या टॅब्लेट्सची किंमत सांगितली आहे. सॅसमंगचे हे दोन्ही टॅब 23 जूनपासून सॅमसंग इंडियाची वेबसाइट, अमेझॉन इंडिया आणि देशातील प्रमुख रिटेल स्टोरवरून विकत घेता येतील. Galaxy Tab S7 FE ची किंमत 46,999 रुपयांपासून सुरु होत आहे. तर Galaxy Tab A7 Lite एक बजेट टॅब आहे.
Samsung Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 Lite किंमत
Samsung Galaxy Tab S7 FE भारतात दोन मॉडेलमध्ये सादर केला गेला आहे. या टॅबचा छोटा व्हेरिएंट 4GB रॅम + 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे, याची किंमत 46,999 रुपये आहे. तर 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 50,999 रुपये आहे.
Galaxy Tab A7 Lite देखील दोन मॉडेल्समध्ये आला आहे. हा टॅब 3GB रॅम + 32GB स्टोरेजसह येतो. या टॅबच्या एलटीई व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर वायफाय व्हेरिएंट11999रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. सॅमसंगचे दोन्ही टॅब 23 जूनपासून विकत घेता येतील.
Galaxy Tab S7 FE चे स्पेसिफिकेशन्स
Galaxy Tab S7 FE मध्ये 12.4-इंचाचा LCD डिस्प्ले आहे ज्याचे रिजोल्यूशन 2560 x 1600 पिक्सल आहे. टॅबचा हा डिस्प्ले S Pen सपोर्टसह येतो. या टॅबमध्ये Snapdragon 750G SoC, 6GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेजसह देण्यात आली आहे. हि स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. सॅमसंगने Galaxy Tab S7 FE मध्ये 5MP चा फ्रंट तर 8MP चा रियर कॅमेरा आहे.
Galaxy Tab S7 FE टॅबमध्ये 10,090mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे. हि बटर 45W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह चार्ज करता येईल. परंतु कंपनी फक्त 15W चा चार्जर देते. हा टॅब Android 11 वर आधारित One UI 3.0 वर चालतो.
Galaxy Tab A7 Lite चे स्पेक्स
Tab A7 Lite मध्ये सॅमसंगने 8.7-इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या टॅबमध्ये 3GB रॅम 32GB स्टोरेज देण्यात आली आहे, हि स्टोरेज मायक्रो एसडीकार्डने 1TB पर्यंत वाढवता येते. Galaxy Tab A7 Lite टॅबमध्ये 8MP चा रियर कॅमेरा तर 2MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये 5100mAh ची बॅटरी आहे.