10,090mAh बॅटरीसह Samsung Galaxy Tab S7 लवकरच येणार भारतात; अ‍ॅमेझॉवरून होणार विक्री   

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:05 PM2021-08-24T19:05:37+5:302021-08-24T19:05:41+5:30

Galaxy Tab S7 FE India launch: Samsung Galaxy Tab S7 FE मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750जी प्रोसेसर मिळेल.  

Samsung galaxy tab s7 fe wi fi only model teased to launch in india soon via amazon listing  | 10,090mAh बॅटरीसह Samsung Galaxy Tab S7 लवकरच येणार भारतात; अ‍ॅमेझॉवरून होणार विक्री   

10,090mAh बॅटरीसह Samsung Galaxy Tab S7 लवकरच येणार भारतात; अ‍ॅमेझॉवरून होणार विक्री   

googlenewsNext

Samsung Galaxy Tab S7 FE टॅबलेटचा Wi-Fi व्हेरिएंट लवकरच भारतात सादर केला जाणार आहे. या टॅबलेटसाठी Amazon वर एक माइक्रोसाइट लाईव्ह करण्यात आली आहे. या माइक्रोसाइटवरून आगामी गॅलेक्सी टॅब एस7 एफई वाय-फाय व्हेरिएंटच्या लाँचची माहिती मिळाली आहे. हा टॅबलेट जूनमध्ये लाँच झालेल्या Galaxy Tab S7 FE (LTE) चा वायफाय व्हेरिएंट असेल. जो एलटीई व्हर्जन पेक्षा स्वस्त असू शकतो.  

Amazon च्या माइक्रोसाइटवर युजर्स Samsung Galaxy Tab S7 FE Wi-Fi व्हेरिएंटच्या खरेदीसाठी नोंदणी करू शकतात. या साईटनुसार, या टॅबमध्ये 12.4 इंचाचा डिस्प्ले, डॉल्बी अटॉमस सपोर्ट, आणि 10,090एमएएचची बॅटरी मिळू शकते. तसेच हा टॅबलेट S पेन सपोर्टसह बाजारात दाखल होईल.  

Samsung Galaxy Tab S7 FE चे स्पेसिफिकेशन्स 

Galaxy Tab S7 FE मध्ये 12.4-इंचाचा LCD डिस्प्ले आहे ज्याचे रिजोल्यूशन 2560 x 1600 पिक्सल आहे. टॅबचा हा डिस्प्ले S Pen सपोर्टसह येतो. या टॅबमध्ये Snapdragon 750G SoC, 6GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेजसह देण्यात आली आहे. हि स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. सॅमसंगने Galaxy Tab S7 FE मध्ये 5MP चा फ्रंट तर 8MP चा रियर कॅमेरा आहे.  

Galaxy Tab S7 FE टॅबमध्ये 10,090mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे. हि बटर 45W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह चार्ज करता येईल. परंतु कंपनी फक्त 15W चा चार्जर देते. हा टॅब Android 11 वर आधारित One UI 3.0 वर चालतो.  

Web Title: Samsung galaxy tab s7 fe wi fi only model teased to launch in india soon via amazon listing 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.