10,090mAh च्या दमदार बॅटरीसह Samsung टॅब भारतात लाँच; लाँच ऑफर अंतर्गत मिळवा 4000 रुपयांचा डिस्काउंट 

By सिद्धेश जाधव | Published: September 2, 2021 02:50 PM2021-09-02T14:50:06+5:302021-09-02T14:55:38+5:30

Samsung Galaxy Tab S7 FE Wi-Fi: Galaxy Tab S7 FE Wi-Fi व्हेरिएंट मिस्टिक ब्लॅक, मिस्टिक ग्रीन, मिस्टिक पिंक आणि मिस्टिक सिल्वर अश्या तीन रंगात विकत घेता येईल.

Samsung galaxy tab s7 fe wi fi variant launched in india  | 10,090mAh च्या दमदार बॅटरीसह Samsung टॅब भारतात लाँच; लाँच ऑफर अंतर्गत मिळवा 4000 रुपयांचा डिस्काउंट 

10,090mAh च्या दमदार बॅटरीसह Samsung टॅब भारतात लाँच; लाँच ऑफर अंतर्गत मिळवा 4000 रुपयांचा डिस्काउंट 

googlenewsNext
ठळक मुद्देGalaxy Tab S7 FE मध्ये 12.4-इंचाचा QHD LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.Galaxy Tab S7 FE टॅबमध्ये 10,090mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung ने मे महिन्यात जागतिक बाजारात Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 लाँच केले होते. हे दोन्ही टॅब जूनमध्ये भारतीयांच्या भेटीला आले होते. परंतु तेव्हा भारतात Galaxy Tab S7 FE टॅबचा फक्त LTE व्हेरिएंट लाँच करण्यात आला होता. आता सॅमसंगने Galaxy Tab S7 FE Wi-Fi व्हेरिएंट लाँच केला आहे. हा टॅब देशात मिस्टिक ब्लॅक, मिस्टिक ग्रीन, मिस्टिक पिंक आणि मिस्टिक सिल्वर अश्या तीन रंगात विकत घेता येईल.  

Samsung Galaxy Tab S7 FE Wi-Fi व्हेरिएंटची किंमत 

Galaxy Tab S7 FE Wi-Fi व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा नवीन सॅमसंगटॅबलेट अ‍ॅमेझॉन आणि सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवरून विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतर्गत HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांना 4000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक दिला जात आहे.  

Samsung Galaxy Tab S7 FE Wi-Fi चे स्पेसिफिकेशन्स 

Galaxy Tab S7 FE मध्ये 12.4-इंचाचा QHD LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2560 x 1600 पिक्सल आहे. या टॅबमध्ये Snapdragon 778G SoC, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह देण्यात आली आहे. ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हा टॅब Android 11 वर आधारित One UI 3.1 वर चालेल.  

सॅमसंगने Galaxy Tab S7 FE मध्ये 5MP चा फ्रंट तर 8MP चा रियर कॅमेरा आहे. Galaxy Tab S7 FE टॅबमध्ये 10,090mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे. हि बटर 45W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह चार्ज करता येईल. परंतु कंपनी फक्त 15W चा चार्जर देते. Galaxy Tab S7 FE मध्ये AKG-के स्टीरियो स्पिकर, S Pen, Dolby Atmos, Wireless DeX, Wi-Fi 5, Bluetooth v5.0, GPS, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक सपोर्ट देखील देण्यात आला आहे.  

Web Title: Samsung galaxy tab s7 fe wi fi variant launched in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.