लॅपटॉपच्या तोडीची टॅबलेट सीरिज भारतात लाँच; इतकी आहे Samsung Galaxy Tab S8 Series ची किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: February 21, 2022 05:51 PM2022-02-21T17:51:29+5:302022-02-21T17:51:58+5:30

Samsung Galaxy Tab S8 Series Price: Samsung Galaxy Tab S8 Series ची भारतात लाँच झाली आहे चला जाणून घेऊया या सीरिजच्या सर्व मॉडेल्सचे स्पेसिफिकेशन्स आणि भारतीय किंमत.  

Samsung galaxy tab s8 series price india launch specifications features more  | लॅपटॉपच्या तोडीची टॅबलेट सीरिज भारतात लाँच; इतकी आहे Samsung Galaxy Tab S8 Series ची किंमत 

लॅपटॉपच्या तोडीची टॅबलेट सीरिज भारतात लाँच; इतकी आहे Samsung Galaxy Tab S8 Series ची किंमत 

Next

Samsung Galaxy Tab S8 Series भारतात लाँच झाली आहे. या टॅबलेट लाइनअप मध्ये Galaxy Tab S8, Galaxy Tab S8+ आणि Samsung Galaxy S8 Ultra असे तीन मॉडेल सादर करण्यात आले आहेत. या सीरिजची किंमत भारतात 58,999 रुपयांपासून सुरु होते. या लाईनअपच्या सर्व टॅबलेट्स Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर मिळतो. तसेच सॅमसंग या टॅबलेट्ससह S-पेन स्टायलस देत आहे. कव्हर कीबोर्ड किंवा बुक कव्हरसाठी वेगळा खर्च करावा लागेल.  

Samsung Galaxy Tab S8 Series Price 

  • Samsung Galaxy Tab S8 (Wi-Fi) (8GB/128GB): 58,999 रुपये  
  • Samsung Galaxy Tab S8 5G (8GB/128GB): 70,999 रुपये  
  • Samsung Galaxy Tab S8+ (Wi-Fi) (8GB/128GB): 74,999 रुपये  
  • Samsung Galaxy Tab S8+ 5G (8GB/128GB): 87,999 रुपये  
  • Samsung Galaxy Tab S8 Ultra (Wi-Fi) (12GB/256GB): 1,08,999 रुपये  
  • Samsung Galaxy Tab S8 Ultra 5G (12GB/256GB): 1,22,999 रुपये  

या सीरिजची प्री-बुकिंग 22 फेब्रुवारीपासून सुरु होईल, तर 11 मार्चपासून samsung.com आणि ऑफलाईन स्टोर्सवर विक्री सुरु होईल. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 22,999 रुपयांचा कीबोर्ड कव्हर मोफत मिळेल. तसेच HDFC बँक कार्ड धारकांना Tab S8 वर 7000 रुपयांचा कॅशबॅक, Tab S8+ वर 8000 रुपयांचा कॅशबॅक आणि Tab S8 Ultra वर 10,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. 

Samsung Galaxy Tab S8 चे स्पेसिफिकेशन्स 

Galaxy Tab S8 मध्ये 2560×1600 पिक्सल रिजोल्यूशनसह 11 इंचाचा LPTS TFT डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा टॅब 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. सिक्योरिटी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. यात 8,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. टॅबलेटच्या मागे 13MP AF + 6MP अल्ट्रा वाईड सेन्सर असलेला रियर कॅमेरा सेटअप आहे. तर 12MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.  

Samsung Galaxy Tab S8+ चे स्पेसिफिकेशन्स 

Galaxy Tab S8+ मध्ये 2800×1752 पिक्सल रिजोल्यूशनहं 12.4 इंचाचा Super AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. सोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. इन डिस्प्ले फिगरप्रिंट सेन्सरसह येणार हा टॅब 10,090mAH च्या बॅटरीला सपोर्ट करतो. यात 13MP + 6MP चा रियर कॅमेरा सेटअप आहे. तर व्हिडीओ कॉलिंग 12MP च्या फ्रंट कॅमेऱ्याने करता येईल.  

Galaxy Tab S8 Ultra चे स्पेसिफिकेशन्स   

या टॅबलेट सीरिजचा सर्वात पावरफुल मॉडेल म्हणजे Galaxy Tab S8 Ultra. यात 14.6 इंचाचा मोठा डिस्प्ले 2960×1848 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. यात 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे,जी SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. यात 11,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Tab S8 Ultra मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. यात 13MP + 6MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर असलेला कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी देखली यात 12MP + 12MP चा सेन्सर आलेला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.   

हे देखील वाचा:

Web Title: Samsung galaxy tab s8 series price india launch specifications features more 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.