टॅबलेट आहे कि हायएंड कम्प्युटर? मिळणार 11200mAh ची बॅटरी आणि 16GB रॅम; Samsung Galaxy Tab S8 Series ची माहिती लीक 

By सिद्धेश जाधव | Published: February 8, 2022 01:15 PM2022-02-08T13:15:26+5:302022-02-08T13:16:31+5:30

Samsung Galaxy Tab S8 Series उद्या म्हणजे 9 फेब्रुवारीला सादर केली जाऊ शकते. ज्यात Galaxy Tab S8, Galaxy Tab S8+ आणि Galaxy Tab S8 Ultra असे तीन मॉडेल्स सादर केले जाऊ शकतात.  

Samsung Galaxy Tab S8 Tab S8 Plus And Tab S8 Ultra Specifications Revealed Ahead Of 9 February 2022 Launch  | टॅबलेट आहे कि हायएंड कम्प्युटर? मिळणार 11200mAh ची बॅटरी आणि 16GB रॅम; Samsung Galaxy Tab S8 Series ची माहिती लीक 

(सौजन्य: OnLeaks आणि 91mobiles)

Next

Samsung Galaxy Tab S8 Series उद्या म्हणजे 9 फेब्रुवारी 2022 ला लाँच केली जाऊ शकते, अशी माहिती टिपस्टर Evan Blass नं दिली आहे. उद्या आयोजित करण्यात आलेल्या Galaxy Unpacked 2022 या लाँच इव्हेंटमध्ये कंपनी आपली आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज सादर करणार आहे. त्याचबरोबर Galaxy Tab S8, Galaxy Tab S8+ आणि Galaxy Tab S8 Ultra असे तीन टॅबलेट देखील बाजारात येऊ शकतात.  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही सॅमसंगची आतापर्यंतची सर्वात दमदार टॅबलेट सीरिज असेल. यात फ्लॅगशिप Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, S-Pen सपोर्ट, 16GB RAM आणि LTPS डिस्प्ले देखील देण्यात येईल. चला जाणून घेऊया आगामी सॅमसंगच्या फ्लॅगशिप टॅबलेट सीरिजचे लीक स्पेक्स.  

Samsung Galaxy Tab 8 सीरिजचे लीक स्पेक्स 

लीकनुसार, सॅमसंगच्या फ्लॅगशिप टॅबलेट सीरीजच्या बेस मॉडेलमध्ये 11 इंचाची LTPS TFT स्क्रीन मिळेल. जी 2500 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. तर Galaxy Tab S8+ मध्ये 2800 x 1752 पिक्सल रिजोल्यूशनसह 12.4 इंचाची AMOLED स्क्रीन मिळेल. तर Galaxy Tab S8 Ultra मध्ये 14.6 इंचाचा AMOLED डिस्प्ले 2960 x 1848 पिक्सल रिजोल्यूशनसह दिला जाऊ शकतो. 

Samsung Galaxy Tab S8 Series मध्ये 16GB पर्यंत RAM मिळू शकतो. सोबत 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. एवढी मेमरी कमी पडल्यास मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत अतिरिक्त मेमोरी जोडता येईल. या टॅबलेट सीरिजमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोसेसरची पावर मिळू शकते. यात Android 12 आधारित OneUI 4.0 आणि Samsung DEX सपोर्ट मिळेल. 

Samsung Galaxy Tab S8 सीरीजमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 13MP चा प्रायमरी आणि 6MP चा सेकंडरी सेन्सर असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ 12MP चा कॅमेरा मिळू शकतो. सीरीजमधील अल्ट्रा मॉडेल दोन फ्रंट कॅमेऱ्यांसह बाजारात येऊ शकतो.  

Galaxy Tab S8 Series च्या बेस मॉडेलमध्ये सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. तर, अन्य दोन मॉडेल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतील. टॉप मॉडेलमध्ये S-Pen Stylus सपोर्ट देखील मिळेल. Samsung Galaxy Tab S8 मध्ये 8,000mAh ची बॅटरी मिळेल. प्लस मॉडेल 10,090mAh बॅटरीसह तर अल्ट्रा मॉडेल 11,200mAh च्या बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच हे टॅबलेट 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतील.  

हे देखील वाचा:

Samsung करणार कमाल! बजेट सेगमेंट Galaxy A13 4G घेणार दमदार एंट्री; स्पेक्स झाले लीक

हलक्या-फुलक्या अँड्रॉइड ओएससह आला Tecno POP 5S; बजेटमध्ये ड्युअल रियर कमर आणि बरंच काही...

Web Title: Samsung Galaxy Tab S8 Tab S8 Plus And Tab S8 Ultra Specifications Revealed Ahead Of 9 February 2022 Launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.