संपता संपणार नाही Samsung च्या नव्या टॅबची बॅटरी; 11200mAh बॅटरी, चार कॅमेऱ्यांसह येणार बाजारात
By सिद्धेश जाधव | Published: December 17, 2021 07:47 PM2021-12-17T19:47:23+5:302021-12-17T19:47:58+5:30
Samsung Galaxy Tab S8 Ultra: Samsung Galaxy Tab S8 Ultra पुढील वर्षी भारतासह जगभरात सादर केला जाईल. यात 11200mAh बॅटरी, 16GB RAM 45W फास्ट चार्जिंग, 14.6 इंचाचा डिस्प्ले आणि Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देण्यात येईल.
Samsung पुढील वर्षी Galaxy Tab S8 Ultra हा नवीन प्रीमियम टॅबलेट सादर करणार आहे. आता या टॅबचे फीचर्स आणि स्पेसीफेकेशन लीक झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंगचा हा टॅब जाबराट स्पेक्ससह बाजारात येईल. तसेच मोठी बॅटरी असूनही या टॅबलेटचा आकार खूप स्लिम ठेवण्यात येईल.
Samsung Galaxy Tab S8 Ultra
Samsung Galaxy Tab S8 Ultra टॅबमध्ये 14.6 इंचाचा अवाढव्य डिस्प्ले देण्यात येईल. एवढा मोठा डिस्प्ले लॅपटॉप्समध्ये बघायला मिळतो. हा WQXGA+ Super AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी छोटीशी नॉच देण्यात येईल. या टॅबची जाडी फक्त 5.5mm इतकी असेल. याच्या बॅक पॅनलवर S Pen साठी एक मॅग्नेटिक स्ट्रिप आणि फोटोग्राफीसाठी ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात येईल.
टॅबच्या मागे 13 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 6 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा सेन्सर मिळेल. तर फ्रंटला 12 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड अँगल सेन्सर असा ड्युअल सेल्फी कॅमेरा असेल. हा सॅमसंग टॅब इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह सादर केला जाईल.
आगामी सॅमसंग टॅबमध्ये 16जीबी पर्यंतचा रॅम आणि 512जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 ची प्रोसेसिंग पॉवर मिळू शकते. हा डिवाइस अँड्रॉइड 12 बेस्ड One UI 4.1 वर चालेल. या सॅमसंग टॅबमध्ये 11,200mAh ची बॅटरी देण्यात येईल, जी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. भारतात या टॅबच्या बेस व्हेरिएंटची किंमत 89,000 रुपयांच्या आसपास असू शकते.
हे देखील वाचा:
स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर मिळतेय भरघोस सूट; OnePlus 9 सीरीजवर 8,000 रुपयांपर्यंतची बचत
iPhone-iPad चा पासवर्ड विसरलात? काही मिनिटांत करा रिसेट, जाणून घ्या सोप्पी पद्धत