या तारखेला सॅमसंग लाँच करणार 4 डिवाइस; स्मार्टवॉच, इयरबड्ससह दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स येणार बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 06:04 PM2021-07-21T18:04:37+5:302021-07-21T18:06:50+5:30

Samsung Galaxy Unpacked 2021: सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड 2021 इव्हेंटमध्ये Galaxy Watch Active 4 आणि Galaxy Buds 2 लाँच केले जाऊ शकतात.

Samsung galaxy unpacked 2021 event on 11 august z fold 3 watch launch expected  | या तारखेला सॅमसंग लाँच करणार 4 डिवाइस; स्मार्टवॉच, इयरबड्ससह दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स येणार बाजारात

या तारखेला सॅमसंग लाँच करणार 4 डिवाइस; स्मार्टवॉच, इयरबड्ससह दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स येणार बाजारात

Next

Samsung Galaxy Unpacked 2021 इव्हेंटची घोषणा कंपनीने केली आहे. हा ऑनलाईन इव्हेंट 11 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. या इव्हेंटच्या माध्यमातून कंपनी गॅलेक्सी झेड फोल्ड 3 आणि गॅलेक्सी झेड फ्लिप 3 हे दोन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे. 11 तारखेला सॅमसंग नेक्स्ट जेनरेशन गॅलेक्सी बड्स आणि गॅलेक्सी अ‍ॅक्टिव्ह वॉच देखील सादर करणार आहे, याची माहिती कंपनीने शेयर केलेल्या इव्हेंटच्या पोस्टरमधून समोर आली आहे.  

Galaxy Watch Active 4 आणि Galaxy Buds 2  

वर सांगितल्याप्रमाणे सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड 2021 इव्हेंटमध्ये Galaxy Watch Active 4 आणि Galaxy Buds 2 लाँच केले जाऊ शकतात. आगामी गॅलेक्सी वॉच अ‍ॅक्टिव्ह 4 मध्ये 44mm आणि 40mm ची स्क्रीन साइज मिळू शकते. तसेच यात हार्ट-रेट आणि SpO2 सेन्सर मिळू शकतात. हा स्मार्टवॉच मेसेज-कॉल नोटिफिकेशन सारख्या फीचर्सना सपोर्ट करू शकतो. Galaxy Buds 2 इयरबड्स अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फीचरला सपोर्ट करू शकतात.  

Samsung Galaxy Z Fold 3 

Samsung GalaxyZ Fold 3 फोनची डिजाइन गेल्यावर्षीच्या Samsung GalaxyZ Fold 2 सारखी असेल. हा फोन ब्लॅक, गोल्ड आणि ओलिव ग्रीन कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या फोनचा बाहेरील डिस्प्ले 6.2-इंचाचा अ‍ॅमोलेड पॅनल असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिजोल्यूशन FHD+ असेल. त्याचबरोबर फोनमध्ये 7.5-इंचाचा फ्लेक्सीबल अ‍ॅमोलेड डिस्प्ले पॅनल 120Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. हा फोन Snapdragon 888 SoC आणि S Pen सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. 

Samsung Galaxy Z Flip 3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स   

Samsung Galaxy Z Flip 3 मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ फोल्डेबल अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या मागे असलेले एक्सटर्नल डिस्प्ले आधीच्या तुलनेत मोठा असेल. यावेळी हा डिस्प्ले 1.9-इंचाचा असेल. या स्मार्टफोनच्या रेंडरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिसत आहे. परंतु कॅमेरा स्पेक्सची माहिती समोर आली नाही.     

जुन्या Galaxy Z Flip 2 प्रमाणे यात पावर बटण, वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येतील. Galaxy Z Flip 3 मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC, 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल, अशी चर्चा आहे. Samsung Galaxy Z Flip 3 ची किंमत 1,400 डॉलर (अंदाजे 1,04,100 रुपये) असू शकते.    

Web Title: Samsung galaxy unpacked 2021 event on 11 august z fold 3 watch launch expected 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.