Galaxy Unpacked 2021: दोन गॅलेक्सी फोल्डेबल स्मार्टफोन्स उद्या होणार लाँच; अशाप्रकारे बघा Samsung चा इव्हेंट तुमच्या स्मार्टफोनवर  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 07:19 PM2021-08-10T19:19:48+5:302021-08-10T19:20:11+5:30

Galaxy Unpacked 2021: या इव्हेंटमधून कंपनी Samsung Galaxy Z Fold 3, Galaxy Z Flip 3, Galaxy Watch 4, Watch 4 Classic, Galaxy Buds 2 आणि Galaxy S21 FE स्मार्टफोन हे डिवाइस लाँच करू शकते.  

Samsung galaxy unpacked 2021 fold 3 and flip 3 set to launch what to expect  | Galaxy Unpacked 2021: दोन गॅलेक्सी फोल्डेबल स्मार्टफोन्स उद्या होणार लाँच; अशाप्रकारे बघा Samsung चा इव्हेंट तुमच्या स्मार्टफोनवर  

Galaxy Unpacked 2021: दोन गॅलेक्सी फोल्डेबल स्मार्टफोन्स उद्या होणार लाँच; अशाप्रकारे बघा Samsung चा इव्हेंट तुमच्या स्मार्टफोनवर  

Next

उद्या 11 ऑगस्ट रोजी Samsung ने यावर्षीच्या सर्वात मोठ्या इव्हेंटचे आयोजन केले आहे. या Galaxy Unpacked 2021 इव्हेंटच्या माध्यमातून कंपनीने आपले स्मार्टफोन आणि स्मार्ट गॅजेट्स लाँच करणार आहे. सॅमसंगचा हा इव्हेंट उद्या भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण सॅमसंगच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट, सॅमसंग वेबसाईट आणि युट्युब चॅनेलवरून केले जाईल. या इव्हेंटमधून कंपनी Samsung Galaxy Z Fold 3, Galaxy Z Flip 3, Galaxy Watch 4, Watch 4 Classic, Galaxy Buds 2 आणि Galaxy S21 FE स्मार्टफोन हे डिवाइस लाँच करू शकते.  

Samsung Galaxy Z Fold 3  चे स्पेसिफिकेशन्स  

सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन 7.55-इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले आणि 6.2- इंचाच्या कवर डिस्प्लेला सपोर्ट करेल. अँड्रॉइड ओएससह या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 888 चिपसेट मिळू शकतो. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 12MP चा मुख्य सेन्सर, 12MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 12MP चा टेलीफोटो सेन्सर दिला जाऊ शकतो. या फोल्डेबल डिस्प्लेमध्ये 16MP चा अंडर स्क्रीन कॅमेरा सेन्सर असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.    

Samsung Galaxy Z Flip3 चे स्पेसिफिकेशन्स    

Samsung Galaxy Z Flip3 मध्ये 6.7 इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले देण्यात येईल. त्याचबरोबर फोनमध्ये 1.9-इंचाचा डिस्प्ले कव्हरवर दिला जाईल. या फोल्डेबलमध्ये आतल्या बाजूस 10MP चा सेल्फी कॅमेरा आणि बॅक पॅनलवर 12MP-12MP चे दोन कॅमेरे असतील. Galaxy Z Flip3 स्मार्टफोन 3,300mAh च्या बॅटरीला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये Snapdragon 888 चिपसेट असेल, सोबत 8GB रॅम आणि 128GB किंवा 256GB स्टोरेज दिली जाऊ शकते.    

Samsung Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 ची किंमत    

मिळालेल्या माहितीनुसार, Galaxy Z Fold 3 ची किंमत 1,35,000 रुपये तर MRP 1,49,990 रुपये असेल. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये Fold 2 गेल्यावर्षी 1,49,990 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. Galaxy Z Flip 3 ची रिटेल प्राईज 80,000 ते 90,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. Flip 3 भारतात लाँच होणारा सर्वात किफायतशीर फोल्डेबल स्मार्टफोन असेल.   

Web Title: Samsung galaxy unpacked 2021 fold 3 and flip 3 set to launch what to expect 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.