सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या Samsung Galaxy Z Flip 3 ची वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: August 12, 2021 12:10 PM2021-08-12T12:10:24+5:302021-08-12T12:13:35+5:30
Galaxy Z Flip 3 Launch: Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन वॉटर प्रूफ आहे तसेच यात अनेक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सुधारण्यात आले आहेत. असे जरी असले तरी हा सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन आहे.
Samsung ने आपल्या Galaxy Unpacked 2021 इव्हेंटच्या माध्यमातून आपले थर्ड जेनरेशन फोल्डेबल स्मार्टफोन्स सादर केले आहेत. Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 असे दोन स्मार्टफोन कंपनीने या इव्हेंटमधून लाँच केले आहेत. त्याचबरोबर कंपनीने Galaxy Buds 2 आणि Galaxy Watch 4 सीरीज देखील बाजारात आणली आहे. यावर्षी सादर करण्यात आलेला Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन वॉटर प्रूफ आहे तसेच यात अनेक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सुधारण्यात आले आहेत. असे जरी असले तरी हा सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन आहे.
Samsung Galaxy Z Flip 3 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनमध्ये कंपनीने दोन स्क्रीन दिल्या आहेत. यात एक मुख्य स्क्रीन आहे आणि बॅक पॅनलवर एक छोटी सेकंडरी स्क्रीन देण्यात आली आहे. मुख्य डिस्प्लेचा आकार 6.7 इंच आहे, हा एक फुल एचडी+ डायनॅमिक अॅमोलेड डिस्प्ले आहे. हा पंच होल असलेला डिस्प्ले 120HZ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनच्या मागे नोटिफिकेशन, टाइम आणि मेसेज दाखवण्यासाठी 1.9 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो रियर कॅमेऱ्यासाठी व्यू फायन्डरचे देखील काम करतो.
Samsung Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Android 11 आधारित OneUI 3 वर चालतो. सॅमसंगने या Flip फोनसाठी आपल्या यूआयमध्ये खास बदल केले आहेत. या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय 6E, ब्लूटूथ 5.0, एनएफसी, 5G, जीपीएस आणि यूएसबी टाइप-C पोर्ट असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत.
Samsung Galaxy Z Flip 3 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह एक 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. मुख्य डिस्प्लेवरील पंच होलमध्ये 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Samsung Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनमध्ये 3300mAh ची ड्युअल सेल बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Samsung Galaxy Z Flip 3 ची किंमत
Samsung Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. या फोनचा छोटा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि मोठा व्हेरिएंट 8GB रॅमसह 256GB स्टोरेजसह लाँच झाला आहे. या फोनची भारतीय किंमत कंपनीने सांगितली नाही. परंतु हा स्मार्टफोन जागतिक बाजारात 999 डॉलर (सुमारे 74,199 रुपये) मध्ये विकत घेता येईल. 27 ऑगस्टपासून या फोनच्याविक्रीला सुरुवात होईल. भारतात सॅमसंगच्या दोन्ही फोल्डेबल स्मार्टफोनची प्री बुकिंग सुरु आहे आणि प्री बुकिंगवर गिफ्ट देखील देण्यात येत आहेत.