सॅमसंगच्या शानदार फोल्डेबल Samsung Galaxy Z Flip 3 ची डिजाइन लीक; असे असू शकतात फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 01:06 PM2021-06-30T13:06:35+5:302021-06-30T13:10:41+5:30
Samsung Galaxy Z Flip 3 Specs: Galaxy Z Flip 3 मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC, 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल, अशी चर्चा आहे.
सॅमसंग फोल्डबेल फोन्स फोल्ड आणि फ्लिप अश्या दोन सीरिजमध्ये लाँच करते. मागे या सीरिजमधील आगामी Samsung Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 चे रेंडर ऑनलाइन लीक झाले होते. आता टेक वेबसाईट GizNext ने आगामी Galaxy Z Flip 3 चे रेंडर शेयर केले आहेत. त्यामुळे या सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोनच्या डिजाइन आणि कलर व्हेरिएंट्सची माहिती मिळाली आहे. तसेच रिपोर्टमध्ये या स्मार्टफोनच्या नव्या व्हर्जनमध्ये करण्यात आलेल्या बदलांची माहिती समोर आली आहे. (Samsung Galaxy Z Flip 3 leaked renders)
Samsung Galaxy Z Flip 3 ची डिजाइन, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
Samsung Galaxy Z Flip 3 मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ फोल्डेबल अॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या मागे असलेले एक्सटर्नल डिस्प्ले आधीच्या तुलनेत मोठा असेल. यावेळी हा डिस्प्ले 1.9-इंचाचा असेल. या स्मार्टफोनच्या रेंडरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिसत आहे. परंतु कॅमेरा स्पेक्सची माहिती समोर आली नाही.
जुन्या Galaxy Z Flip 2 प्रमाणे यात पावर बटण, वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येतील. Galaxy Z Flip 3 मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC, 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल, अशी चर्चा आहे. Samsung Galaxy Z Flip 3 ची किंमत 1,400 डॉलर (अंदाजे 1,04,100 रुपये) असू शकते. हा स्मार्टफोन डार्क ग्रीन, लाइट पर्पल, ग्रे, ब्लॅक, पिंक, डार्क ब्लू आणि व्हाइट रंगात कलरमध्ये सादर केला जाईल.