सव्वा लाखाच्या फोनमध्ये फक्त 4MP चा सेल्फी कॅमेरा; 12GB रॅमसह अनोखा Samsung Galaxy Fold 3 5G लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: August 12, 2021 11:30 AM2021-08-12T11:30:38+5:302021-08-12T11:33:16+5:30

Samsung Galaxy Z Fold 3 5G: Samsung Galaxy Z Fold 3 5G स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. एक कव्हर स्क्रीन आणि फोन उघडल्यावर मिळणारी मोठी मुख्य स्क्रीन.

Samsung galaxy z fold 3 5g launched with 12gb ram 5 camera dual display price sale specification  | सव्वा लाखाच्या फोनमध्ये फक्त 4MP चा सेल्फी कॅमेरा; 12GB रॅमसह अनोखा Samsung Galaxy Fold 3 5G लाँच 

सव्वा लाखाच्या फोनमध्ये फक्त 4MP चा सेल्फी कॅमेरा; 12GB रॅमसह अनोखा Samsung Galaxy Fold 3 5G लाँच 

Next
ठळक मुद्देSamsung Galaxy Z Fold 3 5G स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट दिला आहे.या फोल्डेबल फोनमध्ये एकूण 5 कॅमेरे आहेत.

काल सॅमसंगने यावर्षीच्या सर्वात मोठ्या Galaxy Unpacked इव्हेंटचे आयोजन केले होते. या इव्हेंटच्या मंचावरून कंपनीने नवीन फोल्डेबल स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि इयरबड्स सादर केले. या सोहळ्याचा आकर्षण बिंदू म्हणजे दोन नवीन फोल्डेबल फोन Samsung Galaxy Z Fold 3 आणि Samsung Z Flip 3 हे होते. नवीन गॅलेक्सी झेड फोल्ड 3 एस-पेन सपोर्टसह सादर करण्यात आला आहे, तसेच हे दोन्ही फोल्डेबल फोन वॉटर प्रूफ आहेत. या लेखात आपण फोल्डेबल फोन Galaxy Z Fold 3 ची माहिती घेणार आहोत.  

Samsung Galaxy Z Fold 3 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy Z Fold 3 5G स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. एक कव्हर स्क्रीन आणि फोन उघडल्यावर मिळणारी मोठी मुख्य स्क्रीन. मोठया मुख्य स्क्रीनवर कंपनीने अंडर डिस्प्ले कॅमेरा दिला आहे, त्यामुळे व्हिडीओ किंवा कंटेंट बघताना कॅमेरा कटआऊटचा व्यत्यय येत नाही. या फोनमध्ये 7.6 इंचाचा QXGA+ डायनॅमिक AMOLED मुख्य डिस्प्ले आणि 6.2 इंचाचा एचडी+ डायनॅमिक AMOLED कवर डिस्प्ले देण्यात आला आहे. हे दोन्ही डिस्प्ले 10 ते 120Hz पर्यंतच्या अ‍ॅडॅप्टिव रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात.  

सॅमसंग गॅलेक्सी Z फोल्ड 3 स्मार्टफोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट दिला आहे. हा फोन 12GB रॅम आणि 512GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित वनयूआयवर चालतो. या थर्ड जनरेशन सॅमसंग फोल्डेबल फोनमध्ये 4,400एमएएचची ड्युअल बॅटरी देण्यात आली आहे जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

या फोल्डेबल फोनमध्ये एकूण 5 कॅमेरे आहेत. Galaxy Z Fold3 5G च्या बॅकपॅनलवरील ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर, 12 मेगापिक्सलचा वाईड अँगल सेन्सर आणि 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या कव्हर डिस्प्लेवर 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. सॅमसंगच्या या नव्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या मुख्य डिस्प्लेच्या डावीकडे 4 मेगापिक्सलचा अंडर डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला आहे. 

Samsung Galaxy Z Fold 3 ची किंमत आणि उपलब्धता  

Samsung Galaxy Z Fold 3 ची किंमत USD 1,799 ठेवण्यात आली आहे. ही किंमत 1,33,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन Phantom Black, Phantom Silver आणि Phantom Green कलरमध्ये विकत घेता येईल. कंपनीने या फोनच्या विक्रीची तारीख आणि भारतातील किंमतीची घोषणा केली नाही, परंतु हा फोन भारतात प्री बुकिंगसाठी उपलब्ध झाला होता.  

Web Title: Samsung galaxy z fold 3 5g launched with 12gb ram 5 camera dual display price sale specification 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.