Samsung Galaxy Z Fold3 स्मार्टफोनच्या अंडर-डिस्प्ले कॅमेऱ्याबाबत नवीन माहिती आली समोर; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: June 5, 2021 05:47 PM2021-06-05T17:47:43+5:302021-06-05T17:49:19+5:30
Samsung Galaxy Z Fold 3 launch: Galaxy Z Fold3 स्मार्टफोनच्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यात इतर कॅमेऱ्याच्या तुलनेत 40 टक्के जास्त प्रकाश ट्रांसमिट केली जाईल.
Samsung आपल्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Z Fold3 वर काम करत आहे. या फोनमध्ये अंडर-डिस्प्ले कॅमेरा असेल, अशी चर्चा आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनबाबत टिपस्टर IceUniverse ने नवीन माहिती सांगितली आहे. टिपस्टरनुसार, सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये इमेज क्वालिटी यापूर्वी आलेल्या अंडर डिस्प्ले सेन्सर्सपेक्षा चांगली चांगली असले.
IceUniverse च्या माहितीनुसार, Galaxy Z Fold3 स्मार्टफोनच्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यात इतर कॅमेऱ्याच्या तुलनेत 40 टक्के जास्त प्रकाश ट्रांसमिट केली जाईल. विशेष म्हणजे अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेला पहिला व्यवसायिक स्मार्टफोन ZTE चा Axon 20 आहे. डिस्प्लेच्या खाली कॅमेरा असल्यामुळे या कंपनीला इमेज क्वालिटीशी तडजोड करावी लागली होती. सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन Z Fold3 ची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन पुढल्या महिन्यात लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.
Fold3's UPC transmittance is as high as 40%+, which is much higher than any other brand UPC solutions you have ever seen.
— Ice universe (@UniverseIce) June 4, 2021
सॅमसंगच्या या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 16MP चा फ्रंट-फेसिंग हिडन कॅमेरा दिला जाईल. हा कॅमेरा सेंसर या आगामी स्मार्टफोनच्या 7.55-इंचाच्या LTPO AMOLED स्क्रीनच्या ठेवण्यात येईल. सॅमसंगच्या या फोल्डेबल स्मार्टफोनच्या बाहेरील डिस्प्लेमध्ये 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 12MP + 12MP + 16MP चे कॅमेरा सेंसर्स मिळण्याची शक्यता आहे.
हा फोल्डेबल स्मार्टफोन Snapdragon 888 SoC सह सादर केला जाऊ शकतो. सॅंमसंगच्या या स्मार्टफोनच्या लाँचबद्दल कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. या फोल्डेबल स्मार्टफोनसह कंपनी Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन देखील लाँच करू शकते.