Samsung चा मोठा घोटाळा उघड; बेंचमार्किंग साईटनं बॅन केले 20 स्मार्टफोन, तुमचा फोन तर नाही ना यादीत?
By सिद्धेश जाधव | Published: March 8, 2022 12:29 PM2022-03-08T12:29:40+5:302022-03-08T12:31:44+5:30
सॅमसंगवर आपल्या स्मार्टफोन्सची परफॉर्मन्स जाणून बुजून कमी करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
Samsung ची ‘एस’ सीरिज सर्वात शक्तिशाली सीरिज आहे. कंपनी या लाईनअपमध्ये फ्लॅगशिप प्रोसेसर असलेले डिवाइस सादर करते. परंतु आता या सीरिजच्या बेंचमार्किंग स्कोर्समध्ये कंपनी छेडछाड करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बेंचमार्किंग साईट Geekbench नं आता सॅमसंगचे चार सीरिजचे स्मार्टफोन बॅन केले आहेत. यात लेटेस्ट Galaxy S22 सीरीजसह Galaxy S21, Galaxy S20, आणि Galaxy S10 समवेत 20 स्मार्टफोन्सवर बंदी घातली आहे.
रिपोर्टनुसार, सॅमसंग आपल्या स्मार्टफोनमध्ये Games Optimization Service (GOS) चा वापर करते. ही सर्व्हिस 10,000 पेक्षा जास्त अॅप्सची परफॉर्मन्स स्लो डाउन करते आणि गेमिंग अॅप्सची परफॉर्मन्स वाढवते. तसेच अनेक गेम्स देखील या सर्व्हिसमुळे स्लो होत आहेत. त्याचबरोबर हे फोन Instagram, TikTok, Twitter, आणि 6,800 पेक्षा जास्त अॅप्स थ्रोटल करतात.
विशेष म्हणजे GOS बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म्स 3DMark, AnTuTu, PCMark, GFXBench, आणि Geekbench 5 यांच्या परफॉर्मन्सवर प्रभाव टाकत नाही. त्यामुळे सॅमसंगच्या स्मार्टफोन्सचे बेंचमार्क स्कोर चांगले येतात आणि रोजच्या वापरातील अॅप्स मात्र स्लो होतात. GOS अॅप्स ओळखून अॅक्टिव्हेट होते, असं गिकबेंचला दिसून आलं आहे. याआधी वनप्लस देखील अशी थ्रोटलिंग करत असल्याचं समोर आलं होतं.
सॅमसंगची बाजू
सॅमसंगनं Android Police शी बोलताना आपला बचाव केला आहे. आपल्या युजर्सना बेस्ट मोबाईल एक्सपीरियंस द्यायचा आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे. Game Optimizing Service (GOS) गेमिंगच्या वेळी ग्रेट परफॉर्मन्स आणि डिवाइसचं तापमान कमी ठेवण्यासाठी डिजाइन करण्यात आली आहे. परंतु GOS नॉन गेमिंग अॅप्सची परफॉर्मन्स मॅनेज करत नाही.
गीकबेंचनं बॅन केलेले सॅमसंगचे फोन्स
- Samsung Galaxy S22, Galaxy S22+, Galaxy S22 Ultra
- Samsung Galaxy S21, Galaxy S21+, Galaxy S21 Ultra, Galaxy S21 FE
- Samsung Galaxy S20, Galaxy S20 5G, Galaxy S20+, Galaxy S20+ 5G, Galaxy S20 Ultra,
Galaxy S20 Ultra 5G, Galaxy S20 FE, Galaxy S20 FE 5G
- Samsung Galaxy S10, Galaxy S10 5G, Galaxy S10+,
- Galaxy S10e, Galaxy S10 Lite
हे देखील वाचा:
- 12 हजारांच्या आत Realme चा 5000mAh बॅटरी असलेला फोन लाँच; असे आहेत भन्नाट Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स
- दमदार Realme 9 5G आणि Realme 9 5G SE स्मार्टफोन येतायत भारतात; या दिवशी होणार लाँच
- पार्टीची शान वाढवतील ‘हे’ दमदार साऊंड क्वॉलिटी असलेले ब्लूटूथ स्पिकर्स; पाहा यादी