सिनेमा हॉलपेक्षा शानदार अनुभव मिळवा टीव्हीवर; Samsung ने लाँच केला 8K डिस्प्ले असलेली Smart TV
By सिद्धेश जाधव | Published: April 2, 2022 04:49 PM2022-04-02T16:49:37+5:302022-04-02T16:49:54+5:30
Samsung Neo QLED 8K TV जागतिक बाजारात लाँच झाला आहे. यात अनेक दमदार फीचर्स कंपनीनं दिले आहेत.
Samsung नं काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटचं आयोजन करून अनेक प्रोडक्टस सादर केले होते. या ‘अनबॉक्स अँड डिस्कव्हर’ नावाच्या कार्यक्रमातून Samsung Neo QLED 8K TV नं देखील पदार्पण केलं आहे. 8K रिजोल्यूशन असलेला शानदार डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर आय कम्फर्ट, डॉल्बी अॅटमॉस 90W चे स्पिकर्स असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.
Samsung Neo QLED 8K चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Neo QLED 8K TV चा आकार किती मोठा असेल, हे मात्र कंपनीनं सांगितलं नाही. परंतु यात 8K रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल. तसेच यात टीव्हीची पिक्चर क्वॉलिटी सुधारण्यासाठी ‘शेप अडॅप्टिव लाईट कंट्रोल’ फीचर देण्यात आलं आहे, जे Quantum Mini LEDs चा वापर करतं. यातील आय-कम्फर्ट मोड तुमच्या डोळ्यांवर टीव्हीचा दुष्परिणाम होऊ देत नाही.
प्रोसेसिंगसाठी कंपनीनं Neural Quantum Processor चा पार केला आहे. यातील Samsung Smart Hub मध्ये फीचर्स, सेटिंग्स आणि कन्टेन्ट एकाच ठिकाणी मिळतील. गेमिंगसाठी Samsung Neo QLED 8K TV मध्ये चार एचडीएमआय 2.1 पोर्ट्स, Motion Xcelerator Turbo Pro 4K 144Hz गेमिंग, सुपर अल्ट्रावाईड गेम-व्यू आणि गेमबार देण्यात आला आहे.
फक्त डिस्प्ले नव्हे तर यातील साऊंड क्वॉलिटी देखील शानदार आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 90W 6.2.4 चॅनेल ऑडियो सिस्टम देण्यात आली आहे. जी नवीन टॉप चॅनेल स्पिकर आणि ‘ऑब्जेक्ट ट्रॅकिंग साऊंड प्रो’ सह डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करते. या टीव्हीमध्ये वायरलेस डॉल्बी अॅटमॉस फीचर देखील मिळतं. हा टीव्ही सध्या जागतिक बाजारात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. परंतु भारतीय लाँचची माहिती मात्र मिळाली नाही.