एकच नंबर! जगातील सर्वात पहिला 200MP कॅमेरा लाँच; ‘या’ स्मार्टफोन कंपनीने केली कमाल

By सिद्धेश जाधव | Published: September 2, 2021 03:26 PM2021-09-02T15:26:53+5:302021-09-02T15:28:16+5:30

Samsung unveils ISOCELL HP1 sensor: जगातील पहिल्या 200MP स्मार्टफोन कॅमेरा सेन्सरसह सॅमसंगने एक नवीन 50MP ISOCELL GN5 सेन्सर देखील लाँच केला आहे.

Samsung launches worlds first 200mp camera  | एकच नंबर! जगातील सर्वात पहिला 200MP कॅमेरा लाँच; ‘या’ स्मार्टफोन कंपनीने केली कमाल

प्रतीकात्मक फोटो. (सौजन्य: Letsgo Digital)

googlenewsNext

Samsung अशी कंपनी आहे जी फक्त स्मार्टफोन बनवत नाही तर स्मार्टफोन्सचे कंपोनंटस देखील बनवते. सॅमसंग OLED डिस्प्ले, NAND फ्लॅश, DRAM चिप, कॅमेरा सेन्सर इत्यादी कंपोनंट्स बनवण्यासाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे यातून कंपनीला नफा देखील जास्त होतो. गेल्यावर्षी सॅमसंगने 108MP ISOCELL HM3 स्मार्टफोन कॅमेरा सेन्सर लाँच केला होता. तर यावर्षी कंपनीने स्मार्टफोनसाठी नवीन 200 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर सादर केला आहे. Samsung ISOCELL HP1 जगातील पहिला 200MP सेन्सर आहे जो 0.64μm पिक्सलसह येतो.  

जगातील पहिल्या 200MP स्मार्टफोन कॅमेरा सेन्सरसह सॅमसंगने एक नवीन 50MP ISOCELL GN5 सेन्सर देखील लाँच केला आहे. जो ऑल डायरेक्टशल फोकसिंग ड्युअल पिक्सल प्रो टेक्नॉलॉजीसह येणारा सिंगल1.0μm पिक्सल कॅमेरा सेन्सर आहे. ज्याचे नाव कंपनीने Samsung ISOCELL GN5 असे ठेवले आहे. यात ड्युअल पिक्सल टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.  

Samsung ISOCELL HP1 200MP कॅमेरा सेन्सर 

Samsung ने नवीन 200MP ISOCELL HP1 कॅमेरा सेन्सर 0.64μm पिक्सलसह सादर केला आहे. हा सेन्सर खूप डिटेल्स कॅप्चर करू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे तुम्ही काढलेला फोटो क्रॉप केल्यावर देखील तितकाच स्पष्ट दिसेल. यात सॅमसंगच्या पिक्सल बाइनिंग टेक्नॉलॉजी ‘ChameleonCell’ चा वापर करण्यात आला आहे.  

हा सेन्सर लो लाइट कंडिशनमध्ये मोठ्या 2.56μm पिक्सलच्या मदतीने 12.5MP रिजोल्यूशनचे आउटपुट देऊ शकतो. नवीन 2.56μm पिक्सल जास्त लाइट कॅप्चर करून इंडोर आणि लो लाइट कंडीशनमध्ये चांगल्या आणि ब्राईट इमेजेस क्लिक करतो. या नवीन 200MP HP1 सेन्सरचा वापर करून 30fps वर 8K व्हिडीओ देखील रेकॉर्ड करता येईल. आगामी Galaxy S22 series मध्ये सॅमसंगचा हा नवीन सेन्सर दिसू शकतो. तसेच शाओमी देखील सॅमसंगकडून हा सेन्सर आपल्या आगामी फ्लॅगशिपसाठी घेऊ शकते.  

Web Title: Samsung launches worlds first 200mp camera 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.