Samsung Galaxy S21 Plus स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; मिळत आहे 10,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक
By सिद्धेश जाधव | Published: June 7, 2021 07:33 PM2021-06-07T19:33:19+5:302021-06-07T19:34:20+5:30
Samsung Galaxy S21 Plus Price: Samsung Galaxy S21 Plus चा 128GB व्हेरिएंट 81,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता, आता हा फोन 71,999 रुपयांमध्ये तर विकत घेता येईल.
Samsung ने फ्लॅगशिप Galaxy S21 Plus स्मार्टफोनवर दमदार ऑफर आणली आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर 10000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळत आहे. जर तुम्ही सॅमसंगचा हा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हि तुमच्यासाठी योग्य वेळ ठरू शकते. Galaxy S21+ स्मार्टफोन 128GB आणि 256GB अश्या दोन स्टोरेज व्हेरिएंटसह बाजारात आला होता. या फोनची किंमत 81,999 रुपयांपासून सुरु झाली होती.
Samsung Galaxy S21 Plus वरील ऑफर
Samsung Galaxy S21 Plus चा 128GB व्हेरिएंट 81,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता, तर 256GB व्हेरिएंट 85,999 रुपयांमध्ये विकत घेता येत होता. परंतु, आता 10,000 रुपयांच्या कॅशबॅकमुळे या दोन्ही मॉडेलची प्रभावी किंमत क्रमशः 71,999 रुपये आणि 75,999 रुपये झाली आहे.
त्याचबरोबर सॅमसंगने आपल्या फ्लॅगशिप Galaxy S21 सीरीजसह बंडल ऑफर देखील जाहीर केली आहे. त्यामुळे या सिरीजमधील स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Buds Pro व्हायरलेस ईयरफोन्ससाठी फक्त 990 रुपये द्यावे लागतील. विशेष म्हणजे गॅलेक्सी बड्स प्रो ची किंमत 15,990 रुपये आहेत. या ऑफरमध्ये ग्राहकांना दहा हजार रुपयांचे Samsung Shop वाउचर पण मिळतील.
Samsung एक अपग्रेड बोनस देखील देत आहे. Samsung Galaxy S21 Ultra आणि Galaxy S21 स्मार्टफोनच्या खरेदीवर क्रमश: 10,000 रुपये आणि 5,000 रुपयांचा अपग्रेड डिस्काउंट मिळत आहे. तसेच, HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डने हे स्मार्टफोन्स विकत घेतल्यास अनुक्रमे 10,000 रुपये आणि 5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. Samsung Galaxy S21 Ultra ची किंमत 1,04,999 रुपये आहे तर Galaxy S21 69,999 रुपयांमध्ये मिळत आहे. सॅमसंगच्या या खास ऑफरचा लाभ Samsung Shop (Samsung.com/in), सॅमसंग एक्सक्लूसिव स्टोर आणि देशातील प्रमुख रिटेल स्टोर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 30 जूनपर्यंत घेता येईल.