Samsung च्या 'या' स्टोरमध्ये फक्त महिला कमर्चारी विकणार मोबाईल, कंपनीनं सुरु केला नवीन ग्रुप
By सिद्धेश जाधव | Published: March 14, 2022 05:48 PM2022-03-14T17:48:58+5:302022-03-14T17:51:53+5:30
सॅमसंगच्या या स्टोरमध्ये सर्व कारभार महिला पाहणार आहेत. यासाठी कंपनीनं या कर्मचाऱ्यांना आवश्यक ती ट्रेनिंग दिली आहे.
Samsung भारतातील लोकप्रिय मोबाईल ब्रँड आहे. चिनी कंपन्यांच्या ऐवजी अनेक भारतीय सॅमसंगला पसंती देतात. आता पुन्हा एकदा सॅमसंगनं भारतीयांचं मन जिंकलं आहे. कंपनीनं भारतात आपल्या पहिल्या मोबाईल स्टोरची सुरुवात केली आहे, जिथला संपूर्ण कारभार महिला सांभाळणार आहेत. जागतिक महिलीया दिनाच्या निम्मिताने हे स्टोर अहमदाबाद येथे सुरु करण्यात आलं आहे.
सॅमसंग स्मार्ट कॅफेमध्ये कस्टमर्सना महिला स्टाफ सेटअपच्या माध्यमातून शॉपिंगचा नवीन अनुभव देण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. या नवीन स्टाफला स्पेशल ट्रेनिंग देण्यात आली आहे. तसेच सॅमसंगनं WiSE (वुमन इन सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स) नावाच्या एका एम्प्लॉयी रिसोर्स ग्रुप (ईआरजी) ची देखील स्थापना केली आहे. जो वयैक्तिक आणि करियरच्या डेव्हलमेंटसाठी महिला कर्मचाऱ्यांना मदत करेल.
Galaxy A Event 2022
Samsung नं आपल्या 17 मार्चच्या इव्हेंटची माहिती दिली आहे. या इव्हेंटमधून Galaxy A सीरीजचे स्मार्टफोन्स सादर केले जातील, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. Samsung Awesome Galaxy A इव्हेंटच्या ऑनलाईन लीक झालेल्या माहितीनुसार कंपनी Samsung Galaxy A53 5G आणि Galaxy A73 5G लाँच करू शकते. भारतीय वेळेनुसार हा इव्हेंट संध्यकाळी 7.30 वाजता सुरु होईल. याचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या YouTube चॅनेल आणि Samsung Newsroom वर बघता येईल.
हे देखील वाचा:
- सुंदर Oppo स्मार्टफोन! 8GB RAM सह OPPO A96 होईल लाँच; इतकी असेल भारतीय किंमत
- एकाच दिवशी Samsung करणार दोन ‘घणाघाती’ वार; 108MP कॅमेऱ्यासह Galaxy A स्मार्टफोन येतोय बाजारात
- 4G रिचार्जच्या किंमतीत 5G Smartphone! अमेझिंग ऑफर मिळवण्यासाठी उरले फक्त काही तास