सॅमसंगचा विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेला स्मार्टफोन; फक्त कॅमेरा, कॉल, एसएमएसची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 11:24 AM2018-04-16T11:24:23+5:302018-04-16T11:24:23+5:30
3 जी, 4 जी कनेक्टिव्हिटीबरोबरच वायफायची सुविधाही या फोनमध्ये देण्यात आलेली नाही.
सोल- सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीनी शुक्रवारी दक्षिण कोरियामध्ये नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला असून यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसेल. 3 जी, 4 जी कनेक्टिव्हिटीबरोबरच वायफायची सुविधाही या फोनमध्ये देण्यात आलेली नाही.
सॅमसंग गॅलेक्स जे2 प्रो दक्षिण कोरियात लॉन्च झाला असून याफोनमध्ये इतर फोनमधील सर्वसाधारण फीचर आहे. मोबाइल कॉल, एसएमएस, कॅमेरा हे सगळे फीचर आहेत पण फोनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली नाही. सॅमसंग गॅलेक्स जे2चं हे नवं मॉडेल फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर वरिष्ठांनाही आकर्षित करणारं आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
या फोनमध्ये इनबिल्ट डिक्शनरी असून विद्यार्थ्यांना इंटरनेटशिवाय योग्य शब्द शोधता येतील. स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेल बॅक कॅमेरा व 5 मेगापिक्सेल फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 1 जीबीची रॅम असून 2,600mAh बॅटेरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 16 जीबी डेटा स्टोरेजची क्षमता आहे.