Samsung ने गुपचूप सादर केला नवीन 5G फोन; 64MP कॅमेऱ्यासह Galaxy M52 लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 03:18 PM2021-09-27T15:18:19+5:302021-09-27T15:18:37+5:30
Samsung Galaxy M52 5G Launch In India: Galaxy M52 5G पोलंडच्या वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे.
सॅमसंगचा नवीन 5G फोन Galaxy M52 कंपनीने गुपचूप पोलंडमध्ये सादर केला आहे. विशेष म्हणजे हा फोन उद्या भारतात सादर केला जाणार आहे. त्यामुळे आता भारतीय लाँचच्या आधीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हा फोन सॅमसंग पोलंडच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे, परंतु या फोनच्या किंमतीची माहिती कंपनीने दिली नाही. (New Samsung 5G Phone Galaxy M52 Launched in Poland)
Samsung Galaxy M52 5G चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी M52 5G मध्ये 6.7 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या सुपर अॅमोलेड डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. यात स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरचा वापर कंपनीने केला आहे. त्याचबरोबर 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Galaxy M52 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमधील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सल रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 पिगापिक्सलचा फ्रंट आहे. हा डिवाइस 25W फास्ट-चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे. सिक्योरिटीसाठी या 5G फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर कनेक्टिविटीसाठी हँडसेटमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, एनएफसी, 5जी आणि टाइप-सी पोर्ट असे पर्याय उपलब्ध आहेत. अशा आहे कि याच स्पेक्ससह हा फोन उद्या म्हणजे 28 सप्टेंबरला भारतात सादर केला जाईल.