सॅमसंग सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत; तीन फोनवर काम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 12:36 PM2022-10-16T12:36:23+5:302022-10-16T12:36:52+5:30

स्मार्टफोनला Wi-Fi अलायन्स सर्टिफिकेट वेबसाईटवर पाहिले गेले आहे. कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च करू शकते

Samsung set to launch cheapest 5G smartphone; Work started on three phones | सॅमसंग सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत; तीन फोनवर काम सुरु

सॅमसंग सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत; तीन फोनवर काम सुरु

googlenewsNext

दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंग येत्या काही दिवसांत भारतात ५जी मार्केट कॅप्चर करण्यासाठी मोठा धमाका करणार आहे. सॅमसंग स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. Galaxy A04e आणि Galaxy M04 या दोन फोनवर कंपनी काम करत आहे. असे असताना आणखी Galaxy A14 5G वर काम करत असल्याचेही समोर आले आहे. 

या स्मार्टफोनला Wi-Fi अलायन्स सर्टिफिकेट वेबसाईटवर पाहिले गेले आहे. कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च करू शकते, असे या सर्टिफिकेशनवरून दिसत आहे. 
हा सॅमसंगचा फोन सर्वात स्वस्त स्मार्टफोनपैकी एक असेल. कंपनी यात अमोलेड डिस्प्लेऐवजी एलसीडी डिस्प्ले ऑफर करू शकते. या महिन्याच्या सुरुवातीला स्मार्टफोनचे रेंडर समोर आले होते. 

Galaxy A14 5G स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-A146P सह Wi-Fi Alliance वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. सध्या या स्मार्टफोनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. सूचीनुसार, नवीन फोनमध्ये 2.4 GHz आणि 5 GHz Wi-Fi सपोर्ट केले जाऊ शकते. फोन Android 13-आधारित One UI 5.0 skin OS वर चालेल. Galaxy A14 ला वॉटरड्रॉप नॉच मिळेल. फोनमध्ये उजव्या कोपर्यात व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण असेल. डाव्या कोपर्‍यात कोणतेही बटण नसेल. फोनमध्ये USB-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅकसह स्पीकर ग्रिल असेल.

Web Title: Samsung set to launch cheapest 5G smartphone; Work started on three phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.