Samsung युजर्स सावधान! तुमच्या परवानगीविना डिलीट होऊ शकतो तुमचा सर्व डेटा; अशी घ्या काळजी  

By सिद्धेश जाधव | Published: April 6, 2022 07:43 PM2022-04-06T19:43:24+5:302022-04-06T19:43:45+5:30

Samsung च्या स्मार्टफोनमध्ये एक दोष सापडला आहे, ज्यामुळे हॅकर्स तुमच्या स्मार्टफोनचा सहज ताबा घेऊ शकतात.  

Samsung Smartphone Vulnerability Allowing Hackers Reset Device Without Permission  | Samsung युजर्स सावधान! तुमच्या परवानगीविना डिलीट होऊ शकतो तुमचा सर्व डेटा; अशी घ्या काळजी  

Samsung युजर्स सावधान! तुमच्या परवानगीविना डिलीट होऊ शकतो तुमचा सर्व डेटा; अशी घ्या काळजी  

Next

Samsung च्या Android 9 ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या स्मार्टफोन्समध्ये मोठा दोष आढळला आहे. डिवाइसच्या सिस्टम लेव्हलमध्ये असलेल्या हा दोष व्हायरस असलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून सिस्टम हायजॅक करून स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट करण्यास हॅकर्सना मदत करू शकतो. या त्रुटीमुळे हॅकर्स फोनचा ताबा घेऊन कॉल्स करणे, अ‍ॅप्स इंस्टॉल किंवा अनइंस्टॉल करणे, अशी काम बिनदिक्कत करू शकतात.  

मोबाईल सिक्योरिटी कंपनी Krytowire नं सॅमसंगच्या डिवाइसेजमधील हा दोष शोधून काढला आहे. कंपनीनं हा CVE-2022-22292 नावाचा हा दोष सॅमसंगकडे गेल्यावर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये रिपोर्ट केला होता. या त्रुटीला हाय रिस्क रेटिंग देण्यात आली आहे. सॅमसंगनं देखील यावर कारवाई करत फेब्रुवारीमध्ये एक सिक्योरिटी अपडेट रोल आउट केला आहे.  

सिक्योरिटी कंपनीच्या रिपोर्टनुसार, Samsung च्या डिवाइसेजमध्ये हा दोष एका प्री-इंस्टॉल्ड अ‍ॅपमुळे आला आहे. या अ‍ॅपमध्ये एक असुरक्षित कंपोनेंट आहे, जो लोकल अ‍ॅप्सना सिस्टम लेवलवर ऑपरेशन करण्याची परवानगी देतो. त्यामुळे युजर्सच्या परवानगीची गरज पडत नाही.  

अशी घ्या काळजी 

हा दोष जुन्या स्मार्टफोन्सवर आढळला आहे. खासकरून Android 9 ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या मोबाईल्समध्ये ही त्रुटी आढळली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे असा फोन असेल तर सर्वप्रथम सॅमसंगनं रोल आउट केलेला सिक्योरिटी अपडेट डाउनलोड करा. तसेच फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन नवीन ऑपरेटिंग सिस्टमचा अपडेट आला आहे का ते बघा. असा अपडेट दिसल्यास नवीन ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करून घ्या.  

Web Title: Samsung Smartphone Vulnerability Allowing Hackers Reset Device Without Permission 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.