आता मिळणार नाही Samsung चा 108MP कॅमेरा असलेला फोन; जाणून घ्या कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 05:45 PM2021-11-26T17:45:58+5:302021-11-26T17:46:20+5:30

Samsung आपली लोकप्रिय Galaxy Note Series बंद करणार असल्याचं दिसत आहे. कंपनी फक्त या सीरिजमध्ये नवीन फोन आणणार नाही तर जुन्या डिवाइसेसची निर्मिती देखील बंद होऊ शकते.  

Samsung to stop production of galaxy note 20 series production by the end of this year  | आता मिळणार नाही Samsung चा 108MP कॅमेरा असलेला फोन; जाणून घ्या कारण 

आता मिळणार नाही Samsung चा 108MP कॅमेरा असलेला फोन; जाणून घ्या कारण 

Next

Samsung नं यावर्षी लोकप्रिय Galaxy Note Series लाँच केली नाही. तसेच कंपनीनं या सीरिजचा अविभाज्य भाग असलेल्या S-Pen देखील Galaxy S21 Series च्या Galaxy S21 Ultra स्मार्टफोनमध्ये दिला आहे. ऑगस्टमध्ये एका लाँच इव्हेंटमधून यावर्षी Note Series स्मार्टफोन लाँच केली जाणार नाही, अशी घोषणा केली होती. आता बातमी आली आहे कि सीरिजमधील शेवटच्या Galaxy Note 20 ची निर्मिती देखील बंद करण्यात येईल.  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग गॅलेक्सी नोट सीरीजमध्ये याआधी आलेल्या जुने डिवाइस आता निर्माण करणार नाही. यावर्षीच्या शेवटी म्हणजे पुढील महिन्यानंतर या सीरीजच्या डिवाइसेसचं प्रोडक्शन कायमच बंद होईल. या सीरीजची विक्री घटल्यामुळं कंपनीनं आपल्या सर्वात लोकप्रिय सीरीजचं प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु याची अधिकृत घोषणा मात्र समोर आलेली नाही.  

फोल्डेबल फोन्सची प्रसिद्धी देखील नोट सीरिजच्या अस्ताचे कारण आहे, अशी चर्चा आहे. कंपनी सध्या फोल्डेबल डिवाइसेसवर लक्ष केंद्रित करत आहे. लोकप्रिय S-Pen सपोर्ट मात्र Galaxy S आणि Z Flip आणि Z Fold सीरीजच्या डिवासेसमध्ये देखील दिला जाईल, असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.  

Samsung Galaxy Note 20 चे स्पेसिफिकेशन्स  

सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 मध्ये 6.7-इंचाचा फुल-एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.   

Galaxy Note 20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 12-मेगापिक्सलचा वाईड-अँगल कॅमेरा आणि 64 मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. हा सॅमसंग फोन 10 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Galaxy Note 20 मध्ये 4,300mAh ची बॅटरी आहे.   

Web Title: Samsung to stop production of galaxy note 20 series production by the end of this year 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.