सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट 9 वरून अखेर पडदा हटला; 512 जीबी मेमरी, वॉटरप्रुफ आणि बरेच काही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 02:14 PM2018-08-10T14:14:01+5:302018-08-10T14:14:06+5:30
नवी दिल्ली : सॅमसंगने अखेर आपल्या बहुप्रतिक्षित गॅलॅक्सी नोट 9 वरून पडदा हटवला आहे. Samsung Galaxy Note 9 ला एका कार्यक्रमात लाँच करण्यात आले आहे. हा नवा फॅब्लेट मागील वर्षी आलेल्या गॅलॅक्सी नोट 8 चे अद्ययावत व्हर्जन आहे.
नव्या गॅलॅक्सी नोट 9 सोबत नव्या रुपात स्टायलिश एस पेन देण्यात आले आहे. तसेच या फोनची मेमरी 512 जीबी पर्यंत आहे. ती आणखी 512 जीबी वाढविता येऊ शकते. म्हणजेच वापरकर्त्याला एकूण 1 जीबी स्टोरेज मिळणार आहे. जे की आजच्या इतर फोनच्या तुलनेत खुपच जास्त आहे. अमेरिकेमध्ये हा फोन स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसरसह मिळणार आहे, तर भारतासाठी 2.7 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर एक्सनॉक्स 9810 हा प्रोसेसर देण्यात येणार आहे.
वैशिष्ट्ये
6.4 इंच क्वाड एचडी+ सुपर एमोलेड(1440x2960 पिक्सल) स्क्रीन आहे. कॅमेऱ्याचा विचार केल्यास नोट 9 मध्ये 12 मेगापिक्सलचे दोन रिअर सेंसर कॅमेरे देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी एफ 1.7 अपार्चरचा 8 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. नोट 9 में इनबिल्ट डेक्स सपॉर्ट आहे. तसेच तो आयपी 68 रेटिंगमध्ये येत असल्याने फोन पाण्यात भिजल्यानंतरही सुरक्षित राहणार आहे.
किंमत किती?
गॅलॅक्सी नोट 9 हा काळ्या, चंदेरी, जांभळ्या आणि निळ्या अशा चार रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. फोनच्या 128 जीबी व्हेरिअंटची किंमत 68,700 रुपये, 512 जीबीच्या व्हेरिअंटची किंमत 85,900 रुपयांदरम्यान असणार आहे. अमेरिकेमध्ये आगाऊ बुकिंग 10 ऑगस्टपासून तर विक्री 24 जुलैपासून सुरु होणार आहे.
बॅटरी
नोट 9 ला फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी 4000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. एसस पेनमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही देण्यात आली आहे. हे पेन 40 सेकंदात चार्ज होते.