Satellite Network आता दूर नाही; Jio ने उचलले मोठे पाऊल, TRAI समोर ठेवली 'ही' मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 05:14 PM2024-10-10T17:14:11+5:302024-10-10T17:15:19+5:30
Jio Satellite Network : भारतात सॅलेलाईट नेटवर्क सुरू करण्यासाठी कंपन्या प्रयत्न करत आहेत.
Jio Satellite Network : देशात सॅटेलाइट नेटवर्क आणण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. आता रिलायन्स जिओकडूनही अशीच बातमी समोर येत आहे. भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटरने JIO ने या संदर्भात ट्रायला प्रतिक्रिया दिली आहे. जिओने म्हटले की, ट्रायने त्यांच्या सॅटेलाइट स्पेक्ट्रमच्या किंमतीबाबत कंसल्टेशन पेपरवर पुनर्विचार करावा. जिओचा असा विश्वास आहे की, हे पेपर्स टेरेस्ट्रियल आणि सॅटेलाइट नेटवर्क प्रोव्हायडर्समध्ये समन्वय निर्माण करत नाहीत.
एवढंच नाही, तर जिओने एअरवेव्हच्या वाटपाबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. सॅटेलाइट प्लेयर्सना स्पेक्ट्रम देण्यास तीव्र विरोध झाला आहे. जिओचे म्हणणे आहे की, जर कोणाला सॅटेलाइट नेटवर्क व्यावसायिक वापरासाठी वापरायचे असेल, तर ते लिलावाद्वारेच केले पाहिजे. पण असे न केल्याने खूप नुकसान होते. याचा अर्थ जिओ सॅटेलाइट स्पेक्ट्रम लिलावाला गांभीर्याने घेत आहे.
यापूर्वी कंपन्यांनी केलेला विरोध
यापूर्वी लिलावाच्या पर्यायाला सॅटकॉम कंपन्यांनी विरोध केला होता. ही प्रक्रिया त्यांच्या व्यवसायासाठी चांगली नसल्याचे त्यांनी सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Jio ने TRAI ला लिहिले की, हा कंसल्टेशन पेपर आणि त्याच्या परिणामी शिफारसी कायदेशीर आव्हानांना असुरक्षित आहेत. विशेषतः दूरसंचार विभागाच्या संदर्भात नमूद केलेल्या समस्येचे निराकरण करण्यात ते अयशस्वी ठरते.
दूरसंचार विभागाने ट्रायला या सूचना दिल्या
या सर्व मुद्द्यांवर आता विचार करावा, असे दूरसंचार विभागाने ट्रायला सांगितले आहे. जिओला हे स्पेक्ट्रम लिलावाशिवाय मिळू नये अशी इच्छा आहे. त्यासाठी सर्व कंपन्यांनी प्रक्रिया करावी. विशेष म्हणजे, सॅटेलाइट नेटवर्कच्या शर्यतीत इलॉन मस्क यांचे नाव जागतिक बाजारपेठेत अव्वल आहे. मस्क सध्या या क्षेत्रावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत.