भारतात बसणार सॅटेलाइट नेटवर्क, सरकारने दिली परवानगी, 'हे' रिचार्ज स्वस्त होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 04:10 PM2024-08-01T16:10:18+5:302024-08-01T16:10:47+5:30
सॅटेलाइट नेटवर्कबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता काही रिचार्ज स्वस्तात मिळणार आहे. यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे.
डीटीएच वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे DTH सेवा देणाऱ्या कंपन्यांसह ग्राहकांनाही मोठा फायदा होणार आहे. परदेशी उपग्रह ऑपरेटर देखील भारतात स्थानिक युनिट्स सुरू करू शकतात, अशी नवीन धोरणात कंपन्यांना परवानगी आहे. एप्रिल २०२५ पासून, कंपन्यांना त्यांची इच्छा असल्यास भारतात नवीन सेटअप सुरू करण्याची परवानगी आहे.
₹१९५ वर जाणार TATAचा 'हा' शेअर; गुंतवणूकदारांच्या उड्या, LICकडे आहेत ९५ कोटी शेअर्स
या निर्णयानंतर कोणतीही विदेशी कंपनी भारतात त्यांचा सेटअप सुरू करू शकते. तसेच, आता भारतीय उपग्रह वापरकर्ते याचा वापर करू शकणार आहेत. Jio, Airtel सारख्या कंपन्यांनाही याचा फायदा होऊ शकतो. कारण यानंतर त्यांना स्वस्तात सॅटेलाइट नेटवर्क मिळणे सोपे होणार आहे.
आतापर्यंत DTH साठी सॅटेलाइट वापरण्यासाठी देखील कंपन्यांना USD मध्ये पैसे द्यावे लागतात. पण जर आता यासाठी परवानगी मिळाली आहे, तर भारतातील कंपन्या INR मध्ये पेमेंट करू शकतात. यासंदर्भात सरकार परदेशी कंपन्यांशी करारही करत आहे. याचा फायदा ग्राहकांनाही होणार आहे.
...तर सेवा शुल्क देखील कमी होऊ शकतात
SES, AsiaSat, Instelsat आणि Measat सारख्या कंपन्या सध्या भारतीय कंपन्यांना सॅटेलाइट नेटवर्क पुरवत आहेत. यात टीव्ही ब्रॉडकास्टर आणि डीटीएच ऑपरेटर देखील आहेत. पण आता पेमेंट डॉलरमध्ये आहे, जर INR मध्ये पेमेंट केले असेल तर सेवा शुल्क देखील कमी होऊ शकते.
यासाठी कंपन्यांना काही परवानगी काढावी लागणार आहे. इंडियन नॅशनल स्पेस प्रोमोशन ऑफ ऑथराइजेशन कडून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी एप्रिल २०२५ ही अंतिम मुदतही निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक घटकांकडूनही याबाबत मदत घेता येईल. कोणत्याही परदेशी कंपनीला भारतात त्यांची सुविधा सुरू करायची असल्यास त्यांनी भारतीय एजन्सीची परवानगी घ्यावी लागणार आहे.