मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांची दिवाळी गोड; मिळाले इतके वेतन, ऐकून थक्क व्हाल..!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 07:12 PM2024-10-25T19:12:18+5:302024-10-25T19:12:55+5:30
Satya Nadella Update: 2014 मध्ये सत्या नडेला यांना मायक्रोसॉफ्टचे CEO बनवण्यात आले होते.
Satya Nadella Net Worth : मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे CEO सत्या नडेला (Satya Nadella) यांची यंदाची दिवाळी गोडं झाली आहे. कंपनीने त्यांच्या पगारात घसघशीत वाढ केली आहे. 2024 मध्ये सत्या नडेला यांना पगार आणि भत्त्यांसह 79.1 मिलियन डॉलर्स (670 कोटी रुपये) मिळणार आहेत. हा आकडा 2023 च्या तुलनेत 63 टक्के अधिक आहे. 2014 नंतर ही पहिलीच वेळ आहे की, सत्या नडेला यांना $79.1 मिलियन मिळणार आहेत. 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ झाल्यानंतर त्यांना $84 मिलियन पगार देण्यात आला होता.
सत्या नडेला यांच्या पगारात वाढ झाल्याची माहिती गुरुवारी नियामक फाइलिंगद्वारे समोर आली आहे. नडेला यांच्या पगाराचा एक मोठा भाग परफॉर्मन्स बेस्ड स्टॉक अवॉर्ड्समधून येतो, ज्याचे मूल्य 2024 मध्ये $71.2 मिलियन आहे. गेल्या वर्षी त्यांना परफॉर्मन्स बेस्ड स्टॉक अवॉर्ड्समधून $39 मिलियन देण्यात आले होते. याशिवाय, त्यांचा एकूण पगार $48.5 मिलियन होता.
दरम्यान, मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये 2024 मध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, गुरुवारी(24 ऑक्टोबर 2024) कंपनीचे मार्केट कॅप $3.6 ट्रिलियनपर्यंत वाढले आहे. कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये केलेली गुंतवणूक आणि तंत्रज्ञानामुळे महसूल वाढल्याने कंपनीचे मूल्यांकन वाढले आहे.