सत्या नाडेलांची दुखरी नस कोणालाच दिसली नाही! पण त्यांच्या मुलामुळे सेलेब्रल पाल्सीच्या लाखो रुग्णांना मोठी मदत झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 08:01 PM2022-03-04T20:01:33+5:302022-03-04T20:02:22+5:30
जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असलेला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरला असेल तर तुमचा झेनमुळे अस्तित्वात आलेल्या फीचर्सशी संबंध आला असेल.
Microsoft कंपनीचे सीईओ सत्या नाडेला (Satya Nadella) यांच्या मुलाचे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी निधन झालं. झेन नडेला या त्यांच्या मुलाला जन्मत: सेलेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) हा आजार होता. कदाचित या बातमीमुळे तुम्हाला झेनविषयी समजलं असेल. परंतु जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असलेला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरला असेल तर तुमचा झेनमुळे अस्तित्वात आलेल्या फीचर्सशी संबंध आला असेल.
जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी मायक्रोसॉफ्टनं दिव्यांग लोकांना आपले प्रोडक्ट्स वापरता यावे म्हणून अनेक फीचर्सचा समावेश आपल्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये केला. दिव्यांग लोकांसाठी बनवण्यात आलेल्या या फीचर्सना ‘अॅक्सेसिबिलिटी’ फीचर्स म्हणतात. यात स्क्रीनवरील शब्द वाचून दाखवणे, शब्द मोठे करून दाखवणे आणि लॅपटॉप किंवा कम्प्यूटरची ब्राईटनेस वाढवणाऱ्या फीचर्सचा समावेश आहे.
हे सर्व फीचर्स ऑपरेटिंग सिस्टम असावेत असं मायक्रोसॉफ्टला का वाटलं? याच श्रेय सत्या नडेलांच्या मुलाला अर्थात झेनला जातं. 28 फेब्रुवारीला जरी झेनचा मृत्यू झाला असला तरी कोट्यवधी लॅपटॉप आणि कम्प्यूटरमध्ये तो जिवंत आहे.
2014 मध्ये जेव्हा सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे सीईओ बनले तेव्हा कंपनीचे प्रोडक्ट डिजाइन करताना त्यांची विचारसरणी बदलली. तसेच त्यांच्या नेतृत्वाची पद्धत देखील बदलली. ते दिव्यांग लोकांचा विचार करून प्रोडक्ट्स डिजाईन करू लागले. झेनमुले ते स्पेशली एबल्ड लोकांसाठी चांगली सर्विस देण्याचा प्रयत्न करू लागले, अशी माहिती सत्य नडेलांनी 2017 मध्ये एका लिंक्डइन पोस्टमधून दिली आहे.
आजही मायक्रोसॉफ्टच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून दिव्यांग लोकांच्या सशक्तीकरणासाठी उपाय शोधण्याचं कमी इंजिनियर्स करत आहेत. याचं एक उदाहरण Microsoft Seeing AI आहे. हे मायक्रोसॉफ्टच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस APIs कोर्टनावर आधारित एक अॅप्लिकेशन आहे जो दृष्टीहीन लोकांना वस्तू कोणती आहे हे सांगण्यास मदत करतो.
हे देखील वाचा:
- खिशात पैसे नाहीत? तरीही करा रेल्वे तिकीट बुक, जाणून घ्या सोप्पी पद्धत
- बाजूला व्हा! 6,599 रुपयांमध्ये आला जबरदस्त स्वदेशी स्मार्टफोन, चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ
- भन्नाट टच स्क्रीन लॅपटॉप! कमी किंमतीत मोठा डिस्प्ले, डिटॅचेबल कीबोर्ड आणि स्टायलस सपोर्ट