भारीच! ओटीटी कंटेट पाहताना केवळ एक बटन दाबल्याने हाेतेय 195 वर्षांची बचत?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 12:00 PM2022-03-20T12:00:00+5:302022-03-20T12:00:24+5:30

वेब सीरिजचे ‘बिंज वॉचिंग’चे प्रमाण आता वाढू लागले आहे

Save 195 years with skip intro button while watching ott content | भारीच! ओटीटी कंटेट पाहताना केवळ एक बटन दाबल्याने हाेतेय 195 वर्षांची बचत?

भारीच! ओटीटी कंटेट पाहताना केवळ एक बटन दाबल्याने हाेतेय 195 वर्षांची बचत?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क : ओटीटी, वेब सीरिज, थ्रीलर हे सर्व आता परवलीचे शब्द झाले आहेत. ओटीटी माध्यमापासून दूर असलेला शोधून सापडणे कठीण, अशी या माध्यमाची भुरळ सर्वांना पडली आहे. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन यासारख्यांची सुरुवातीला या क्षेत्रात असलेली मक्तेदारीही आताशा कमी होऊ लागली आहे. असो. वेब सीरिजचे ‘बिंज वॉचिंग’चे प्रमाण आता वाढू लागले आहे. हे असे सलग पाहताना एका बटनाचा सातत्याने वापर केला जातो. ते बटन म्हणजे स्किप इन्ट्रो...

इन्ट्रो म्हणजे काय?
ओटीटीवरील कोणत्याही कंटेंटच्या सुरुवातीला दाखवले जाणारे शीर्षक गीत वा अन्य कोणताही मजकूर म्हणजेच इन्ट्रो होय.
या इन्ट्रोमध्ये संबंधित वेब सीरिजचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, अभिनेते इत्यादींची माहिती असते. हा इन्ट्रो वेब सीरिजच्या प्रत्येक भागावेळी दाखवला जातो.
साहजिकच प्रत्येक भागाच्या सुरुवातीला दाखवला जाणारा हा इन्ट्रो टाळण्याकडे प्रेक्षकांचा ओढा असतो. त्यासाठी ‘स्किप इन्ट्रो’ हा पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

‘स्किप इन्ट्रो’ ही संकल्पना आली कुठून?
सगळ्यात आधी ही संकल्पना नेटफ्लिक्सने आणली. जगात सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असलेला ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे नेटफ्लिक्स
नेटफ्लिक्सने केलेल्या एका पाहणीत १५% प्रेक्षक एखादी सीरिज पाहत असताना तिची सुरुवातीची माहिती (शीर्षक गीत वा सुरुवातीला दाखवण्यात येणारा मजकूर) स्किप करत असल्याचे आढळले.
एकच शीर्षक गीत वा तत्सम मजकूर सर्व भागांच्या सुरुवातीला असेल तर ते टाळून पुढे जाण्याचा प्रेक्षकांचा हा कल लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने २०१७ मध्ये ‘स्किप इन्ट्रो’ची संकल्पना पुढे आणली.

किती लोक वापरतात?
१३.६० कोटी ओटीटी प्रेक्षक ‘स्किप इन्ट्रो’ हे बटन दररोज जगभरात वापरतात.
१९५ वर्षांची बचत झाल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे.

नेटफ्लिक्सनंतर सर्वच ओटीटी माध्यमांनी ‘स्किप इन्ट्रो’ बटनाचा पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध करून दिला आहे.
एवढेच नव्हे तर चित्रपट वा वेब सीरिज ओटीटीवर पाहताना १० सेकंद पुढे वा मागे (फॉरवर्ड-रिवाइंड) करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: Save 195 years with skip intro button while watching ott content

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.