क्यूआर काेड करताय स्कॅन? स्मार्टफाेन हॅक हाेण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 08:28 AM2023-05-24T08:28:48+5:302023-05-24T08:29:24+5:30

वैयक्तिक माहिती हॅकर्सच्या ताब्यात, भारत आणि अमेरिकेत सर्वाधिक धाेका

Scan a QR code? Fear of smartphone hacking, save from fraud | क्यूआर काेड करताय स्कॅन? स्मार्टफाेन हॅक हाेण्याची भीती

क्यूआर काेड करताय स्कॅन? स्मार्टफाेन हॅक हाेण्याची भीती

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात क्यूआर काेडद्वारे पेमेंट करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यूपीआयवर आधारित पैसे देण्याची ही पद्धत लाेकप्रिय ठरली. त्यामुळे साहजिकच सायबर भामटेदेखील याकडे वळले आहेत. बनावट क्यूआर काेड लावून लाेकांचे स्मार्टफाेन हॅक करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतासह अनेक देशांमध्ये हा धाेका वाढला आहे.

स्कॅमर्स खऱ्या क्यूआर काेडऐवजी खाेटा काेड चिकटवतात. त्यातून फाेन हॅक केला जाताे. सर्व माहिती हॅकर्सला मिळते आणि काही क्षणांत खाते रिकामे हाेते. एवढेच नव्हेतर, तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर करून ब्लॅकमेलदेखील केले जाते. यासंदर्भात एफबीआयने इशारा दिला आहे. 

क्रिप्टाेविश्वातही स्कॅम
खाेटे क्यूआर काेड क्रिप्टाेकरन्सी उद्याेगातही आहेत. क्रिप्टाेमध्ये क्यूआर काेडद्वारे देवाणघेवाण हाेते. त्यामुळे स्कॅमर्सकडून हे क्षेत्र टार्गेट केले जाते.

कसा हाेणार बचाव?
n अज्ञात लाेकांकडून मिळालेले क्यूआर काेड स्कॅन करू नका.
n काेड स्कॅन 
करताना वेब यूआरएल तपासून घ्या.
n काेड नीट 
पाहा. एखाद्या काेडला कव्हर केलेल्या स्टीकरसारखा वाटल्यास स्कॅन 
करू नका.
n क्यूआर काेड 
स्कॅन केल्यानंतर ऑटाेमॅटिक लिंक ओपन करण्याचे सेटिंग बंद करा.
n क्यूआर काेडमधील 
चुकीचे अक्षर 
किंवा स्पेलिंगकडे 
लक्ष द्या.

या देशांमध्येही धाेका वाढला
भारत, अमेरिकेसाेबतच जपान, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड इत्यादी देशांमध्ये क्यूआर काेड स्कॅमचा धाेका वाढला.

अशी हाेते फसवणूक
n रेस्टाॅरंट, कॅफे इत्यादी ठिकाणी क्यूआर काेड स्कॅन करून मेन्यू तुमच्या समाेर येताे. 
n पैसे देण्यासाठीही क्यूआर काेड असताे. मात्र, खऱ्याऐवजी स्कॅमर्स खाेटा काेड लावतात. 
n ताे स्कॅन केल्यावर युझर्स ऑनलाइन मेन्यू किंवा पेमेंट चेकआउटवर नेण्याऐवजी फाेनमध्ये मालवेअर टाकले  जाते आणि त्यातून वैयक्तिक माहिती चाेरली जाते.
भारतात सर्वाधिक धाेका
n काेराेना काळात भारतात 
क्यूआर काेडचा वापर माेठ्या प्रमाणात वाढला. 
n जागतिक टेक सपाेर्ट स्कॅम अहवालानुसार, भारतीयांना तंत्रज्ञानाशी संबंधित वित्तीय फसवणुकीचा धाेका खूप जास्त आहे. त्यातही तरुणांची फसवणूक हाेण्याची शक्यता जास्त आहे.

भारतीयांचे सरासरी १५ ते २० हजारांचे नुकसान
सर्वाधिक क्यूआर काेड स्कॅनिंग
    अमेरिका    ४२.२%
    भारत    १६.१%
    फ्रान्स    ६.४%
    ब्रिटन    ३.६%
    कॅनडा    ३.६%
    स्राेत : क्यूआरटायगर

Web Title: Scan a QR code? Fear of smartphone hacking, save from fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.