लग्नाचा किंवा मित्रांचा वाढदिवस विसरता? आता नो टेन्शन; WhatsApp चं Message Schedule 'अशी' करेल मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 04:27 PM2022-01-12T16:27:20+5:302022-01-12T16:37:41+5:30
WhatsApp Message Schedule : काही जण लग्नाचा किंवा मित्राचा वाढदिवसही विसरतात. पण आता चिंता करू नका कारण यामध्ये व्हॉट्सअॅप तुम्हाला मदत करणार आहे.
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर आणत असतं. यामुळे बरीच कामं सोपी होत असतात. पण अनेकदा कामाच्या धावपळीत जवळच्या व्यक्तींचा वाढदिवस किंवा एखाद्या चांगल्या प्रसंगी शुभेच्छा देण्यास आपण हमखास विसरतो. काही जण लग्नाचा किंवा मित्राचा वाढदिवसही विसरतात. पण आता चिंता करू नका कारण यामध्ये व्हॉट्सअॅप तुम्हाला मदत करणार आहे. व्हॉट्सअॅप अधिकृतपणे तुम्हाला कोणतेही फीचर देत नाही. पण तुम्ही थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने हे करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरची मदत घ्यावी लागेल. कसं ते जाणून घेऊया.
- सर्वप्रथम, तुम्हाला Google Play Store वरून SKEDit प डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल.
- आता तुम्हाला येथे साइन इन करण्यास सांगितले जाईल, तुम्ही Create account वर क्लिक देखील करू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही Facebook च्या मदतीने अकाऊंट देखील तयार करू शकता. असे करण्यापूर्वी तुम्ही अटी मान्य कराव्यात.
- तुम्ही साइन इन करताच तुम्हाला या अॅपमध्ये चार पर्याय दिसतील, त्यापैकी एक व्हॉट्सअॅप असेल.
- आता WhatsApp वर क्लिक करा आणि खाली दिलेल्या DONE वर टॅप करा.
- यानंतर तुम्हाला स्क्रीनवर पाच पर्याय दिसतील, येथे तुम्हाला शेड्यूल मेसेजची माहिती मिळेल.
- आता व्हॉट्सअॅप निवडल्यानंतर, तुम्हाला एनेबल एक्सेसिबिलिटी पॉप अप वर टॅप करावे लागेल.
- आता तुमच्या फोनची सेटिंग्ज ओपन होईल. येथे इंस्टॉल्ड सर्व्हिसेसवर टॅप करा आणि SKEDit वर टॅप करा आणि ते चालू करा. तुम्हाला एक पॉप-अप दिसेल त्याला परवानगी द्या.
- तुमच्या समोर एक स्क्रीन उघडेल जिथून तुम्ही मेसेज शेड्यूल करू शकता.
- येथे TO सेक्शनमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीसाठी मेसेज शेड्यूल करत आहात त्याचं नाव टाका. पॉप-अप स्वीकारा. तुम्ही ओके केल्यावर लगेच व्हॉट्सअॅप उघडेल, तुम्हाला ज्याला इथे मेसेज करायचा आहे त्यावर टॅप करा, त्याचे नाव SKEDit अॅपवरील TO सेक्शनमध्ये दिसेल.
- आता वेळ, तारीख यासारखे डिटेल्स सिलेक्ट करून वर दिलेल्या उजव्या चिन्हावर टॅप करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.