तंत्रज्ञानाची कमाल! शास्त्रज्ञांनी विकसित केलं Corona Risk Calculator; लसीची पहिली गरज कोणाला हे सांगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 02:33 PM2020-12-17T14:33:04+5:302020-12-17T14:36:19+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात असून जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात असून जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान शास्त्रज्ञांनी एक जबरदस्त कॅल्क्यूलेटर विकसित केलं आहे. ज्याच्या मदतीने कोरोना लसीची सर्वात पहिला कोणाला गरज आहे याची माहिती मिळणार आहे. जॉन्स हॉपकिंस ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी कोरोना व्हायरस मॉर्टैलिटी रिस्क कॅल्क्यूलेटर (Coronavirus Mortality Rate Risk Calculator) तयार केलं आहे.
कॅल्क्यूलेटरमुळे लसीकरणावेळी प्राधान्यक्रम ठरवणं सहज सोपं होणार आहे. कोणत्या वयोगटातील लोकांना सर्वप्रथम लसीकरणाची आवश्यक आहे हे सांगणार आहे. तसेच एखाद्या देशातील कोरोनाची स्थिती, सोशियो डेमोग्राफिक आकड्याचं विश्लेषण देखील देणार आहे. सध्या या कॅल्क्यूलेटरची चाचणी घेतली जात आहे. वय, लिंग आणि वैद्यकीय इतिहास यांच्या आधारे या कॅल्क्यूलेटरच्या साह्याने एखाद्या व्यक्तीला कोविड-19च्या संसर्गाच्या धोक्याचा अंदाज घेता येणार आहे.
CoronaVirus News : कौतुकास्पद! कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि वैदयकीय क्षेत्रातील कर्मचारी करताहेत अहोरात्र काम https://t.co/OK3gsV9ZtP#coronavirus#CoronaVirusUpdate#coronawarriors#Doctor
— Lokmat (@MiLOKMAT) December 14, 2020
अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेमध्ये कार्यरत असलेले नीलांजन चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही विकसित केलेल्या कॅल्क्यूलेटर संख्यात्मक पद्धतीने काम करतो आणि कोरोनाचा धोका ओळखून ज्यांना खरंच लसीकरणाची पहिला गरज आहे त्याची माहिती मिळणार आहे असं देखील म्हटलं आहे. मधूमेह असणाऱ्या रुग्णांना कितपत धोका आहे, तसेच त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल यासारख्या गोष्टींची देखील माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
कोरोनाचा हाहाकार! जगभरातील रुग्णांची संख्या 7 कोटींवर, लाखो लोकांना गमवावा लागला जीवhttps://t.co/Xbyl25bWwr#CoronaVirusUpdates#CoronaVirus#WHOpic.twitter.com/fTwCJaiIrS
— Lokmat (@MiLOKMAT) December 17, 2020
"...तर नववर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचा विस्फोट, परिस्थिती आणखी गंभीर होणार"; WHO चा इशारा
जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने सात कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने एक गंभीर इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी जारी केलेल्या एका इशाऱ्यामध्ये युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. तसेच नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. WHO नाताळ हा सण साजरा करताना लोकांनी मास्क घातलं नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीतर तर युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचे संकट अधिक गंभीर होऊ शकतं असंही म्हटलं आहे. लोकांनी नाताळनिमित्त चर्चमध्ये जाताना किंवा पार्ट्यांना जाताना मास्क नाही घातले तर नववर्षामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळू शकेल असा धोक्याचा इशाराही दिला आहे.
Corona Vaccine : महासत्ता असलेली अमेरिका कोरोनापुढे हतबल, लसीसंदर्भात घेतला मोठा निर्णयhttps://t.co/XuOs8yyUfv#coronavirus#CoronaVirusUpdates#CoronavirusVaccine#PfizerCovidVaccine#America
— Lokmat (@MiLOKMAT) December 12, 2020