भारतातील सेकंड हॅन्ड स्मार्टफोन्सची विक्री वाढली; काही मिनिटांत संपतोय स्टॉक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 06:02 PM2021-09-01T18:02:04+5:302021-09-01T18:06:49+5:30

Second-hand smartphone sales: 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रीफर्बिश्ड स्मार्टफोनची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे.

Second hand smartphone sales increase in 2021  | भारतातील सेकंड हॅन्ड स्मार्टफोन्सची विक्री वाढली; काही मिनिटांत संपतोय स्टॉक 

भारतातील सेकंड हॅन्ड स्मार्टफोन्सची विक्री वाढली; काही मिनिटांत संपतोय स्टॉक 

googlenewsNext
ठळक मुद्दे2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रीफर्बिश्ड स्मार्टफोनची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे. 4 ते 6 हजार रुपयांच्या आत मिळणारे रीफर्बिश्ड स्मार्टफोन अर्ध्या तासात आउट-ऑफ-स्टॉक होत आहेत.  

कोरोना महामारीमुळे नवीन स्मार्टफोन्स आणि लॅपटॉपच्या पुरवठा करण्यात कंपन्यांना अडचणी येत आहेत. यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या डिव्हाइसेसच्या किंमती देखील वाढवल्या आहेत. परंतु या परिस्थितीचा फायदा रीफर्बिश्ड स्मार्टफोन बाजारला होताना दिसत आहे. नवीन डिवाइसेजची जेवढी मागणी आहे तेवढे डिवाइस बाजारात उपलब्ध नसल्यमुळे ग्राहक सेकेंड हॅन्ड फोनकडे वळत आहेत. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रीफर्बिश्ड स्मार्टफोनची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मोबाईल फोन्सची मागणी सतत वाढत असल्याचे OLX ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.  

युजर्सना वापरलेल्या स्मार्टफोन्सचे नूतनीकरण केले जाते आणि ते विक्रीसाठी आणले जातात, अशा स्मार्टफोन्सना रीफर्बिश्ड स्मार्टफोन म्हणतात. हे फोन्स सुस्थिती असतात म्हणून यांची विक्री केली जाते. विशेष म्हणजे नवीन स्मार्टफोन्स प्रमाणे या फोन सोबत देखील काही दिवसांची वॉरंटी मिळते. नवीन फोनच्या तुलनेत हे रीफर्बिश्ड स्मार्टफोन 15 ते 20 टक्के कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होतात.  

आऊट-ऑफ-स्टॉक होत आहेत जुने फोन्स  

2021 मध्ये आतापर्यंत रीफर्बिश्ड स्मार्टफोनची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे, असे वेब मार्केट प्लेस Yaantra च्या रिपोर्टमधून समोर आले आहे. Yaantra चे सीईओ आणि सहसंस्थापक जयंत झा यांनी इकनॉमिक टाइम्सला सांगितले कि, 4 ते 6 हजार रुपयांच्या आत मिळणारे रीफर्बिश्ड स्मार्टफोन अर्ध्या तासात आउट-ऑफ-स्टॉक होत आहेत.  

OLX वर Apple iPhone च्या मागणीत वाढ 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मोबाईल फोन्सची मागणी सतत वाढत असल्याचे OLX ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच जुन्या फोनच्या बाजारात आयफोनची मागणी जास्त आहे. OLX च्या प्री-ओन्ड स्मार्टफोन स्टडी 2020 नुसार, अ‍ॅप्पल आयफोनला युजर्स इतर ब्रँड्सपेक्षा सर्वात जास्त पसंती देत आहेत.  

Web Title: Second hand smartphone sales increase in 2021 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.