सेलकॉन युनीक स्मार्टफोनची लिस्टींग
By शेखर पाटील | Published: February 20, 2018 11:49 AM2018-02-20T11:49:59+5:302018-02-20T11:50:30+5:30
सेलकॉन मोबाईल्स या कंपनीने सेलकॉन युनीक या मॉडेलला बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून कंपनीच्या संकेतस्थळावर याची लिस्टींग करण्यात आली आहे.
सेलकॉन मोबाईल्स या कंपनीने सेलकॉन युनीक या मॉडेलला बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून कंपनीच्या संकेतस्थळावर याची लिस्टींग करण्यात आली आहे.
सेलकॉन युनीक (Celkon UniQ) हा स्मार्टफोन ग्राहकांना ८,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आल्याचे कंपनीच्या संकेतस्थळावरील लिस्टींगवरून दर्शविण्यात आले आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये या मॉडेलला गोल्ड आणि ग्रे रंगाच्या पर्यायांमध्ये प्रत्यक्षात खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. यात ५ इंच आकारमानाचा आणि एचडी रेझोल्युशन (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण असेल. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.
सेलकॉन युनीक या स्मार्टफोनमध्ये अतिशय उत्तम दर्जाचे कॅमेरे देण्यात आले आहेत. यात एलईडी फ्लॅशसह १६ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा दिलेला आहे. तर यातील ८ मेगापिक्सल्स क्षमतेच्या फ्रंट कॅमेर्यामध्ये मूनलाईट फ्लॅशची सुुविधा प्रदान करण्यात आली आहे. याच्या मदतीने कजी उजेड असतांनाही अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी काढता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याच्या पुढील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले असून याची संरचना अॅपल आयफोनच्या टच आयडीप्रमाणे करण्यात आली आहे. यात २७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. लवकरच हे मॉडेल ग्राहकांना देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे.